बीएएमएस कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांना कार्यमुक्तीचा घाट !

प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा पुन्हा व्हेन्टीलेटरवर जाण्याची शक्यता
बीएएमएस कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांना कार्यमुक्तीचा घाट !

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाच्या कठीण काळात ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देवून कोविड योद्धा म्हणून संबोधल्या जाणार्‍या बी.ए.एम.एस.तदर्थ् कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या पदस्थापनेच्या नियुक्तीच्या ठिकाणी एम.बी.बी.एस. बंधपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांना नियुक्ती दिली जावून बी.ए.एम.एस.तदर्थ,कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांना कार्यमुक्त करण्याचा घाट रचला जात आहे.

त्यामुळे राज्यातील बी.ए.एम.एस.कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यावर अन्याय होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा पुन्हा व्हेन्टीलेटरवर जाण्याची शक्यता आहे.

करोना साथ उद्रेकाच गांभीर्य व कर्तव्याची जाणीव ठेऊ शासनाच्या अडचणीच्या काळात बी.ए.एम.एस. तदर्थ कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांनी कुठलेही आंदोलन करुन शासनाला वेठीस न धरता अहोरात्र सेवा दिली आहे व देत आहेत.

मात्र, मागील 4 ते 5 दिवसापासून कोविड योदधा म्हणून संबोधल्या जाणार्‍या बी.ए.एम.एस. तदर्थ् कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या पदस्थापनेच्या नियुक्तीच्या ठिकाणी एम.बी.बी.एस. बंधपत्रीत वैद्यकीय अधिकार्‍यांना नियुक्ती देवुन बी.ए.एम.एस. तदर्थ,कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांना कार्यमुक्त करण्यात येत आहे.

यामुळे त्यांचेवर खुप मोठा अन्याय होत आहे. भविष्यात एमबीबीएस बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी उच्च शिक्षणासाठी अथवा बंधपत्रित कालावधी संपल्यानंतर सेवेतून कार्यमुक्त झाल्यावर संबंध महाराष्ट्रातील प्राथ.आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा पुन्हा व्हेन्टीलेटरवर जाण्याची शक्यता आहे.

खडसेंची आरोग्य मंत्र्यांशी चर्चाबीएएमएस आर्हताधारक तदर्थ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांनी कोरोना महामारीत आरोग्य सेवेला दिलेले योगदान लक्षात घेता त्यांच्या नियुक्तीचे ठिकाणी बंधपत्रित एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी यांना नियुक्ती दिली तरी त्या ठिकाणी कार्यरत बीएएमएस वैद्यकीय अधिकारी यांना कार्यमुक्त करण्यात येवु नये, असे संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ.अभिषेक ठाकूर, राज्य उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय साळुंखे व इतर 15 जिल्ह्यातील प्रतिनिधींच्या स्वाक्षरी असलेले निवेदन जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे खेवलकर यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना देण्यात आले.

त्याअनुषंगाने खडसे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी फोनवर संवाद साधून राज्यात एकही बीएएमएस कंत्राटी, तदर्थ वैद्यकीय अधिकारी कार्यामुक्त करण्यात येणार नाही, असे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चर्चेव्दारे दिले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com