भुुसावळ (प्रतिनिधी) bhusawal

येथील नगराध्यक्षांनी मद्यधुंद अवस्थेत माजी नगरसेवक पुत्र बंटी तुते यांना अर्वाच शिविगाळ केल्याची ऑडिओ क्लिप मागील काही दिवसांपासून व्हायर झाली आहे. यामुळे विकास कामांची मागणी करणार्यांवर नगराध्यक्ष कशाप्रकारे दबाव व शिविगाळ करुन अवाज दाबण्याचा प्रयत्न करतात याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे. दरम्यान या शिविगाळ नंतर संबंधित युवकाच्या डोक्यावर वार करुन गंभीर जखमी केल्याची ही चर्चा आहे.

व्हायरल ऑडिओ क्लिप बाबत आपल्याला माहिती नाही. तसा काही विषय नाही. आपण बाहेर गावी असल्यामुळे जास्त बोलता येणार नाही.

- रमण भोळे, नगराध्यक्ष भुसावळ.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील माजी नगरसेवक मधु तुते यांचे पुत्र बंटी तुते यांनी काही दिवसांपूर्वी रात्री उशीरा नगराध्यक्ष रमण भोळे यांना फोन लावून शहरातील धम्म नगर भागात दोन हापसे मारण्याची मागणी करत असतांना नगराध्यक्षांनी मद्यधुंद अवस्थेत तुते यांना अर्वाच्य शिविगाळ केल्याची घटना घडली. यावेळी वाद विकोपाला जात असल्यामुळे नगराध्यांनी तुते यांना थेट आपल्या जळगाव रोडवरील काचबंगल्यावर येण्याचे आव्हाण दिल्याचे व्हायरल ऑडिओ क्लिपवरुन स्पष्ट होत आहे.

दरम्यान, नगराध्यक्षांचे आव्हाण स्विकारुन बंटी तुते हे थेट काच बंगल्यावर दाखल झाले असता त्या ठिकाणी नगराध्यक्षांसह सहकारी उपस्थित होते. त्या वेळी रात्री उशीरा तुते यांच्या डोक्यावर काहीतरी लोखंडी साहित्याने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना. घडली होती. मात्र तुते यांना तात्काळा रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले व सर्व प्रकरण पोलिसात जाण्याआधिच रफादफा करण्यात आला.