हतनुर
हतनुर|हतनुर धरण
जळगाव

हतनुर धरणाचे २४ दरवाजे पूर्ण उघडले

नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

Rajendra Patil

जळगाव - Jalgaon

जिल्ह्यातील तापी नदीवर असलेल्या हतनुर प्रकल्प (hatnur dam) पाणलोट क्षेत्र परिसरात 38.4 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे पाण्याच्या आवकेत वाढ होत आहे. त्यामुळे शुक्रवार दि.14 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता हतनूर प्रकल्पाचे 24 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून 71 हजार 125 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यातील हतनुर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या आवकेमुळे पातळीत वाढ होत असून आतापर्यंत गेल्या चोवीस तासात 38.4 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच नदी काठच्या क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे पाण्याच्या आवकेत सतत वाढ होत आहे. हतनूर प्रकल्प पाण्याची पातळी 209.940 मिटर असून 193.60 मि.मी. क्युबिक आहे.

शुक्रवार दि.14 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता प्रकल्पाचे 24 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून प्रकल्पातून 71 हजार, 125 क्यूसेक वेगाने तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com