Videoयोगायोग : गिरणातून २४६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग

सलग दुसर्‍या वर्षी देखिल १७ सप्टेबर रोजीच विसर्ग
Videoयोगायोग : गिरणातून २४६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग

जळगाव - jalgaon

जिल्हयातील तीन मोठया प्रकल्पापैकी गिरणा प्रकल्पात होणार्‍या पाण्याच्या आवकेमुळे बुधवार सायंकाळीच १०० टक्के पूर्ण भरला होता. त्यानुसार प्रकल्पातून गुरूवार दि.१७ सप्टेबर रोजी...

दुपारी १२ वाजेनंतर प्रकल्पाचा केवळ एक दरवाजा १ फूटाने उघडून १हजार २०० तर दोन तासांनंतर दुसरा दरवाजा देखिल उघडण्यात येवून २४६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गिरणा नदीपात्रात १५ मे २०२० रोजी बिगर सिंचनाचे आवर्तन आले होते.त्यानंतर गिरणा नदीपात्र बहुतांश ठिकाणी कोरडे असून प्रथमच नदीपात्रात पुराचे अतिरिक्त पाणी सोडण्यात येत आहे. शिवाय प्रकल्पात होत असलेल्या आवकेनुसार विसर्गात वेळोवेळी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठालगत असलेल्या गावातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

विशेष म्हणजे गेल्या वर्षी देखिल गिरणा प्रकल्प पूर्णपणे १०० टक्के भरल्यानंतर १७ सप्टेबर २०१९ रोजी सकाळी ९ वाजता १५०० क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला होता. गिरणा प्रकल्प जिल्हयातील सर्वात मोठा प्रकल्प असून हतनूर २५५.दलघमी, वाघूर २४८.५५ अशी असून या दोनही प्रकल्पांची मिळून क्षमते इतकी गिरणा प्रकल्पाची क्षमता ५२३.५५ दलघमी १८.४८७ टिएमसी आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com