जळगाव : तहसीलसमोरील जीर्ण इमारतीचा ‘ढाचा’ कोसळला
जळगाव

जळगाव : तहसीलसमोरील जीर्ण इमारतीचा ‘ढाचा’ कोसळला

नागरिकांचा जीव धोक्यात; जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

Rajendra Patil

जळगाव । वि. प्र.

जळगाव येथील तहसिल कार्यालयासमोर जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा वेल्फेअर कमिटीची (जिल्हा रिव्हेन्यु क्लब) इमारत जिर्ण झाली असून ती पडण्याची भिती आहे.या जिर्ण इमारतीचा पुढील ढाचा कोसळला असून सुदैवाने 7 दिवसाचा लॉकडाऊन असल्याने गच्चीच्या खाली कोणीही नव्हते नाहीतर एखाद्याला जीव गमवावा लागला असता. जिर्ण इमारतीबाबत संबधित अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे व मुद्रांक विक्री परवाना धारक यांना बसण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या हस्ते कोनशिलाचे उद्घाटन : जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा रिव्हेन्यू क्लबच्या इमारतीच्या कोनशिलाचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते.कोनशिला आजही त्या ठिकाणी आहे. यावरून लक्षात येते कि, जुन्या काळातील इमारत असून ती जिर्ण झाली आहे. मात्र याकडे जिल्हा प्रशासनाने कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.

वेंडरांना बसण्याची व्यवस्था करून द्यावी

शासनातर्फे मुद्रांक विक्री परवाना देण्यात आला असून जिल्हा रिव्हेन्यु क्लबची इमारतीच्या खाली विविध शैक्षणिक कामासाठी वेंडर बसतात यातून मिळणारा महसूल शासनाला मिळवून देतो. मात्र वेंडरांना बसण्याची सुविधा नसल्याने या जिर्ण इमारतीच्या खालीच बसावे लागते. हि इमारत पुर्णता पडण्याची शक्यता आहे. आता तर ढाचाचा कोसळला इमारत कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हि इमारत पाडून वेंडरांना बसण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी मुंद्राक विक्री परवानाधारक अनिल मराठे, निवृत्ती पाटील, सुभाष माळी, प्रकाश सोनवणे, सुलेमान खाटीक, देवकिनंदन गवळी यांनी केली आहे.

मनपाच्या यादीत नाव

या जिर्ण इमारतीबाबत मनपाच्या हद्दीतील जिर्ण इमारतीच्या यादीत नाव असल्याचे समजते.

जिल्हा वेल्फेअर कमिटी

जिल्हा प्रशासनाच्या अंतर्गत जिल्हा वेल्फेअर कमिटीची स्थापना करण्यात आली असून यात अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी असतो,तर निवासी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, मंडळअधिकारी, तलाठी, अव्वल कारकून, लिपीक, शिपाई, कोतवाल असे जिल्हाप्रशासानाच्या विभागातील प्रत्येक एक जण या कमिटीत असतो.

Deshdoot
www.deshdoot.com