कालिंकामाता चौफुलीजवळ डिझेलच्या धावत्या टँकरला आग

कालिंकामाता चौफुलीजवळ डिझेलच्या धावत्या टँकरला आग

जळगाव - Jalgaon :

मनमाड जिल्ह्यतील पाणीवाडी येथून रावेरकडे निघालेल्या इंडियन ऑईल कंपनीच्या पेट्रोल-डिझेलच्या टँकरचे टायर फूटून आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजता महामार्गावरील हॉटेल कमल पॅराडाईजसमोर घडली.

सुदैवाने घटनास्थळी वेळीच अग्निशमन बंब दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.

मनमाड येथील पाणीवाडी येथून दुपारी इंडियन ऑईल कपंनीचा पेट्रोल व डिझेलने भरलेला टँकर (एमएच.४३.वाय.०९४९) हा रावेरच्या दिशेने निघाला होता. रात्री ११ वाजेच्या सुमारास जळगावातील हॉटेल कमल पॅराडाईजसमोरून जात असताना अचानक टँकरचे टायर फूटले. काही क्षणात टँकरच्या खालच्या बाजूला आग लागली.

हा प्रकार नागरिकांना कळताच, त्यांनी मनपा अग्न‍िशमन दिलाला घटनेची माहिती दिली. काही मिनिटातचं बंब घटनास्थळी दाखल झाले.

अग्न‍िशमन दलाच्या कर्मचा-यांनी लागलीचं, पाण्याचा मारा केला व आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. टँकरला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

दरम्यान, वेळीचं बंब घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. आग विझविण्यासाठी अग्न‍िशम दलातील कर्मचारी प्रकाश चव्हाण, देविदास सुरवाडे, जगदीश खडके, राजमल पाटील, पन्नाला सोनवणे, नितीन बारी, निवांत इंगळे, मोहन भाकरे, गंगाधर कोळी, संतोष पाटील आदींनी परिश्रम घेतले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com