गहूखेडा येथे चोरट्यांचा धुमाकूळ

गहूखेडा येथे चोरट्यांचा धुमाकूळ

दहा वीज मोटारींची चोरी शेतकरी भयभीत

गहुखेडा, Gahukheda ता. रावेर | वार्ताहर

सध्या खरीप हंगाम भरला असून पावसाची नितांत गरज असताना वरुणराजाने डोळे वटारल्याने शेतकरी राजा चिंतेत असून त्यात भर म्हणून की काय गहूखेडा सह रणगाव येथील तब्बल दहा शेतकर्‍यांच्या farmers विज मोटारींवर Electric cars चोरट्यांनी डल्ला Dalla by thieves मारून तांब्याची तार Copper wire चोरून नासधूस केल्याने शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर असे की गहूखेडा येथील पितांबर पाटील, शिवाजी पाटील, रंगनाथ पाटील, उमेश पाटील, खुशाल पाटील, रणगाव येथील रमेश पाटील, सदाशिव चौधरी, युवराज चौधरी या शेतकर्‍यांनी शेतीला पाणी देण्यासाठी तापी काठावर वीज मोटारी बसविलेल्या होत्या.

८ ऑगस्टच्या मध्यरात्री चोरट्यांनी वीजपुरवठा बंद असल्याचा फायदा घेत या मोटारीमधील तांब्याची तार चोरून मोटारींची नासधूस करून पोबारा केला.

याबाबत पोलिस पाटील मंदाबाई पाटील यांनी सावदा पोलिसांना खबर देताच सपोनि डी. डी. इंगोले यांनी आपल्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपास सावदा पोलिस करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com