धुळे : तर नाईलाजाने लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल - जिल्हाधिकारी
जळगाव

धुळे : तर नाईलाजाने लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल - जिल्हाधिकारी

जिल्ह्यात आतापर्यंत 1018 रुग्ण झाले करोना मुक्त

Rajendra Patil

धुळे - Dhule

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत 1018 रुग्ण बरे होवून आपापल्या घरी परतले आहेत.

करोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारांसाठी आता खासगी रुग्णालयाचे अधिग्रहण करण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकासाठी जीवनावश्यक वस्तू उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. नागरिकांनी घरीच राहून सुरक्षित राहावे. अत्यावश्यक असेल, तरच घराबाहेर पडावे. सुरक्षित अंतर ठेवत मास्कचा वापर करावा.

हात वेळोवेळी सॅनेटायझर करावेत अथवा साबणाने धुवावेत. नागरिकांनी आवश्यक सहकार्य केले नाही, तर नाईलाजाने लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी म्हटले आहे.

धुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणूबाधित रुग्ण बरे होण्याचा दर 60.77 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

तर मृत्यू दर एप्रिल 2020 मधील 21.43 टक्क्यांवरून 4.71 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. धुळे जिल्ह्यातील एकूण 1675 कोरोनाबाधित रुग्णांपैकी आतापर्यंत 1018 रुग्ण कोरोना विषाणूमुक्त होवून आपापल्या घरी परतले आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com