शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

तालूक्यातील नवी अंतुर्ली येथे अल्पवयीन मुलाने दगडाने ठेचून सहा वर्षीय बालकाची हत्या केल्याचा गुन्हा शिरपूर पोलीसांनी तीन तासात उघड केला आहे.

तर अल्पवयीन मुलावर शिरपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, बोर तोडण्यासाठी घेवून गेल्यावर मोहितचा घात करण्यात आला आहे.

अंतुर्ली येथे राहणार्या ज्योती दिनेश ईशी या दि.23 डिसेंबर रोजी सकाळी त्यांचा मुलगा मोहितसह भीमराव संतोष ईशी यांच्या मालकीच्या शेतात मिरचीची निंदणी करण्यासाठी रोजंदारी कामाला गेल्या होत्या.

त्या इतर महिलांसोबत निंदणी काम करत असतांना मोहित हा शेतात खेळत होता. काही वेळनंतर अल्पवयीन मुलगा तेथे आला व माझ्या सोबत बोर तोडण्यासाठी घेवून जावू का? असे मोहितच्या आईला विचारले व दोघे जण शेतात काही वेळ खेळत होते.

त्यानंतर तो अल्पवयीन मुलगा एकटा शेतात आला. त्यामुळे ज्योती ईशी यांनी त्याला मोहित कुठे आहे? असा प्रश्न केला. त्यावेळी त्याने मोहित हा लाल शर्ट व काळी पँट घातलेल्या माणसाबरोबर गेल्याचे सांगितले. मी त्या माणसाला ओळखत नाही. त्याचा चेहरा पण पाहिला नाही असेही त्याने यावेळी सांगितले.

मोहित हा तर्हाडी गावाकडील बाजूला गेल्याचेही त्याने सांगितले. मोहितचा शोध घेतला पण तो सापडला नाही. सायंकाळी शेतात मोहित मृतावस्थेत आढळून आला.

त्याची दगडाने ठेचून त्या अल्पवयीन मुलाने हत्या केली. अशी फिर्याद ज्योती दिनेश ईशी यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात दिली.

सदर गुन्ह्याचा उलघडा केवळ तीन तासात पोलिसांनी केले. आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी अनिल माने, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पीएसआय सोनवणे, पोहेकॉ गुलाब ठाकरे, पोलीस नाईक अनिल शिरसाट, ललित पाटील, दिनेश माळी, रवींद्र ईशी, सनी सरदार, बापूजी पाटील, अमित जाधव, पाटील, उमेश पाटील, स्वप्नील बांगर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.