जिल्ह्यात एकाचा करोनाने मृत्यू

जिल्ह्यात एकाचा करोनाने मृत्यू

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात नवीन 21 करोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 67 वर्षीय पुरूषाचा (मोहाडी,धुळे) करोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 389 जणांचा कोरोना बळी गेला आहे.

जिल्हा रुग्णालयातील 93 अहवालांपैकी 3 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील सर्व 17 अहवाल निगेटिव्ह आले आहे.

उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील 41 अहवालांपैकी 8 अहवाल पॉझिटिव्ह तर रॅपिड अँटीजन टेस्ट मधील तीनही अहवाल निगेटिव्ह आले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र कापडणे, शिरुड , लामकानी, बोरकुंड, बोरिस, कुसुंबा, खेडा येथील रॅपिड अँटीजन टेस्ट मधील 279 अहवालांपैकी 1 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 93 अहवालांपैकी 3 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. महापालिका रॅपिड अँटीजन टेस्टमधील सर्व 164 अहवाल निगेटिव्ह आले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 10 अहवालांपैकी 1 व खाजगी लॅबमधील 19 अहवालापैकी 5 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. जिल्ह्याची एकुण रूग्ण संख्या 14 हजार 617 इतकी झाली आहे. त्यापैकी तब्बल 14 हजार 60 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com