धरणगाव : मुख्याधिकाऱ्यांच्या वाहनाचा अपघात

जनार्दन पवार थोडक्यात बचावले
धरणगाव : मुख्याधिकाऱ्यांच्या वाहनाचा अपघात

धरणगाव - Dharangaon - प्रतिनिधी :

येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्या वाहनाला मंगळवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला.

या अपघातात चारचाकी गाडीचा चेंदामेंदा झाला आहे. सुदैवाने मुख्याधिकारी पवार यांना मोठी दुखापत झाली नाही.

मुख्याधिकारी जनार्दन पवार हे नाशिक येथे मिटींगला गेले होते. नाशिक येथील काम आटोपून परत येत असताना मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास पिंप्री जवळील पुलाजवळ वाहनावरील त्यांचे नियंत्रण अचानक सुटले.

त्यामुळे कार रस्त्यालगत खड्ड्यात जाऊन पडली. पवार यांनी सीटबेल्ट लावले होते. तसेच एअरबॅग उघडल्यामुळे त्यांना मोठी दुखापत झाली नाही.

दैव बलवत्तर होते म्हणून पवार यांना किरकोळ दुखापतीव्यतीरीक्त काही मोठी इजा झाली नाही. वाहन चालवताना घ्यावयाची अत्यावश्यक काळजी घेतल्यामुळेच आपण या जीवघेण्या अपघातून सुखरुप बचावलो असे पवार म्हणाले. त्यांचेवर पुढील उपचार सुरु आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com