धरणगाव पालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे निलेश चौधरी विजयी
जळगाव

धरणगाव पालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे निलेश चौधरी विजयी

Balvant Gaikwad

धरणगाव, (प्रतिनिधी) –

येथील नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी झाली. यात शिवसेनेचे नीलेश सुरेश चौधरी यांचा ३९५२ मतांनी विजय झाला.त्यांना एकूण १००१२ मते मिळाली.तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार मधुकर रोकडे यांना ६०६० मते मिळाली आहेत.या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाची चांगलीच फरफट झाली.उमेदवार नीलेश चौधरी यांना फक्त ५३१ मते मिळाल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढवली आहे.धरणगाव शहरासह तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील , जिल्हाप्रमूख गुलाबराव वाघ यांनी आपले निर्वावाद वर्चस्व या निवडणूकीत सिध्द केले आहे.नवनियुक्त लोकनियुक्त नगराध्यक्ष यांना साधारण १८ महिन्याचा कालावधी मिळणार आहे. निलेश चौधरी हे पी. आर. हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत.
 शिवसेना उमेदवार विजयी घोषित होताच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळव व फटाक्यांची आतषबाजी तसेच ढोलताश्यांच्या गजर करुन विजयी उमेदवार नीलेश चौधरी यांना खांद्यावर घेवून शहरातून भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. शिवसैनिकांचा आनंद ,ओतप्रोत भरलेला होता.उड्डाणपूल,शिवाजी पुतळा मार्गे नगरपालिका कार्यालय पर्यंत मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणूकीत माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी , माजी नगराध्यक्ष उषा गुलाबराव वाघ , उद्योजक जीवनसिंह बयस , नगरसेवक वासुदेव चौधरी , चर्मकार संघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे , युवासेनेचे उमेश चौधरी सर्व शिवसेना नगरसेवक , शिवसेना पदाधिकारी , शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनिक , सहभागी झाले होते.
विजयी उमेदवार नीलेश चौधरी यांना निवडणुक निर्णय अधिकारी विनय गोसावी,सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी जनार्दन पवार,निरीक्षक तथा आप्पर जिल्हा अधिकारी तथा निरीक्षक नंदकुमार बेडसे,तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्या उपस्थितीत विजयी प्रमाणपत्र देण्यात आले.
*पोटनिवडणूकीसाठी एकूण सात उमेददवार रिंगणात होते.त्यात त्यांना मिळालेली मते आशी– निलेश सुरेश चौधरी,(शिवसेना)(मिळालेली मते-१००१२)  ; मधुकर बन्सी माळी  (भाजपा) (मिळालेली मते -६०६०)  ;  निलेश भागवत चौधरी (राष्ट्रवादी) (५३१) ; महेंद्र सुभाष पाटील(अपक्ष) (८६९) ;’
हाजीशेख  ईब्राहीम अब्दुलरसूल अपक्ष)(३४४)  ; उमेश जानकीराम माळी ( अपक्ष) (८२)  ; संजय एकनाथ माळी (अपक्ष) (६५) ; नोटा (११३)
Deshdoot
www.deshdoot.com