जळगाव । प्रतिनिधी jalgaon

शहरातील ला. ना. शाळेच्या प्रांगणावर पन्नास बाय शंभर फुटावर 11 तास राममंदिर साकारले. त्यानंतर सायंकाळी या प्रतिकृतीवर 5 हजार दिवे प्रज्वलीत केले.

या अद्भूत अशा दिपोत्सवाने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. यावेळी उपस्थित रामभक्तांकडून सियावर रामचंद्र की जय... पवनसूत हनुमान की जय... अशा जयघोष करीत दिपोत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणा साजरा करण्यात आला.

श्रीराम मंदीर निधी संकलन अभियानांतर्गत आयोजित श्रीराममंदीर दीपोत्सव कार्यक्रम ला.ना. सार्वजनिक विद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 6 ते 7 या वेळेत करण्यात आला. या दीपोत्सवात शहरातील विविध शाळांमधील 501 बाल रामभक्त सहभागी झाले होते. या बाल रामभक्तीांनी 5 हजार दिवे लावून 11 तासात दिव्यांनी साकारलेले भव्य राम मंदीर तयार केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आर्किटेक्ट संदीप सिक्ची, सचिन मुसळे व पदाधिकारी यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते शप्रभू श्रीरामांची आरती करण्यात आली.

उपस्थितांनी अनुभवला श्रीराम मंदिराचा दिपोत्सव

दिपोत्सवात सहभाग झालेल्या प्रत्येक बाल रामभक्तांनी पाच मातीचे दिवे, 10 वात व त्या अनुरुप तेल हे साहित्य दीपोत्सवाच्या ठिकाणी सोबत आणाले होते. हे भव्य व विलोभनीय असे दिव्यांच्या रोशणाईने तेजोमयी राम मंदिर अनुभवण्यासाठी पालक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपुर्ण परिसर निघाला उजळून

सुर्यास्त झाल्यानंतर दिपोत्सवाला सुरुवात झाली. सायंकाळच्या अंधारात दिव्यांनी साकारलेल्या श्रीराम मंदिराने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता.

11 तास साकारले राममंदिराची प्रतीकृती

सचिन मुसळे ड्रॉईंग क्लासचे विद्यार्थी हर्षल कदम, भावेश बागूल, उदय नेरकर, चेतन पाटील, रितू बन्सल, दर्शन वाणी, काजल सैनी, युगल चौधरी, गौरव पाटील, भानुदास माळी, निखिल तिवारी यांसह क्लासचे संचालक मुसळे यांनी शनिवार पासून राममंदिराची रांगोळीच्या सहाय्याने प्रतिकृती साकारली. त्यानंतर आज या प्रतिकृतीवर दिवे प्रज्वलीत केले.