30 वर्ष नोकरी करुनही पगाराचे स्वप्न अधूरेच

टाकरखेड्याच्या शिक्षकाचा अपघाती मृत्यू, पत्नी गंभीर
30 वर्ष नोकरी करुनही पगाराचे स्वप्न अधूरेच

अमळनेर Amalner।

तालुक्यातील टाकरखेडा येथे दुपारी चार वाजेच्या सुमारास अमळनेर-धरणगाव रस्त्यावर आयटीआय कॉलेजजवळ The car hit the bike hard दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू Death झाला तर मागे बसलेल्या त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तात्काळ उपचारार्थ अमळनेर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेत टाकरखेडा येथील रहिवाशी गोकुळ मुरलीधर पाटील (वय-51) यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी संगीताबाई पाटील या गंभीर जखमी झाल्या आहेत.

गोकुळ पाटील व त्यांच्या पत्नी हे गावातून आपल्या शेताकडे जात होते. यावेळी गावातील आयटीआय कॉलेज जवळ हा अपघात झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. मात्र, पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर संगीताबाई यांना पुढील उपचारार्थ अमळनेर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत गोकुळ पाटील यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. गोकुळ पाटील हे भिलाली (ता.अमळनेर) येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते.

प्रामाणिक शिक्षकाचा करुण अंत-गोकुळ पाटील हे गेल्या तीस वर्षापासून विनावेतन काम करीत होते. सुरुवातीला टाकरखेड़े येथे विनाअनुदानित शाळेत त्यांनी शिक्षकी पेशाला सुरुवात केली. मात्र शासनाचा दुटप्पी धोरणामुळे त्या शाळेला अनुदान प्राप्त झाले नाही.गेल्या तीन वर्षापासून ती शैक्षणिक संस्था टाकरखेड़े येथून ट्रांसफर होऊन भिलाली येथे सुरु झाली होती. त्यांंचे वय 51असूनही त्यांचे गेल्या 31 वर्षापासून अखंड विनावेतन काम सुरु होते. आत्ता कुठे 20 टक्के पगार मिळणार या आकांशा असताना त्यांचा मृत्यु झाला.

मुलाला केले उच्चशिक्षित

गेले 30 वर्ष विनावेतन काम करूनही गोकुळ पाटील यांनी मिळेल ते काम करीत संसाराचा राहाट गाडा यशस्वी चालविला.त्यांची पत्नी या आशास्वयमसेविका म्हणून काम करीत त्यांनी हातभार लावत मुलाला दोन वर्षापुर्वि एअर फोर्स मध्ये नोकरी मिळवली होती.त्यामुळे घरात आत्ता सुखाचे दिवस आल्याने विनावेतन काम करूनही आपल्या वडिलांनी आपल्याला या पदापर्यंत मजल मारल्याने मुलाने त्यांना दुचाकी घेऊन दिली होती. आज शेतात जाताना त्यांचा अंत झाला. यामुळे गेल्या 21 वर्षापासून ज्ञानदान करणारे शिक्षक गावातून अचानक अपघाती मृत्युने गेल्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली होती.

दि. 22 रोजी 11 वाजेला त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून त्यांच्या पच्यात पत्नी आणि एक मुलगा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com