देशदूत वारीचे अभंग...

समतेचा काला : प्रा.बी.एन.चौधरी
देशदूत वारीचे अभंग...

समतेचा काला

समतेचा काला :

"""""""""""""""""""""

चंद्रभागे तिरी,

गोपाळांचा मेळा.

लुटायला काला,

सज्ज झाला.

इथे नाही भेद,

नाही स्वार्थ इर्षा.

कृपेची ती वर्षा,

विठ्ठलाची.

भाव संस्कारांचे,

दूध दही लोणी.

घाली चक्रपाणी,

प्रेमरस.

वाळवंटा आले,

रुप वैकुंठाचे.

सुख गोकुळाचे,

पाणी भरी.

भना म्हणे ऐसे,

लाभियले भाग्य.

काल्याचे सौभाग्य,

याची देही.

© प्रा.बी.एन.चौधरी.

(९४२३४९२५९३)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com