देशदूत वारीचे अभंग...

रिंगण-धावा : प्रा.बी.एन.चौधरी
देशदूत वारीचे अभंग...

रिंगण-धावा :

""""""""""""""""""

रिंगण वारीचे,

पुर्णत्वाची ग्वाही.

माऊलींची द्वाही,

अश्व देतो.

लागतात वेध,

विठू दर्शनाचे.

नेत्र भाविकांचे,

झरतात.

डोंगर माथ्याला,

कळस दर्शन.

धावा करी मन,

वेळापुरी.

निर्गुणाला लागे,

ध्यास सगुणाचा.

आहेच गुणाचा,

पांडुरंग.

भना म्हणे आता,

निवतील डोळे.

आनंदी सोहळे,

दर्शनात.

© प्रा.बी.एन.चौधरी.

(९४२३४९२५९३)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com