विवरे बुद्रुक येथील उपसरपंचांचा एका दिवसात राजीनामा

राजकीय घडामोडींना वेग-पॅनलप्रमुख वासुदेव नरवाडे यांना जोरदार झटका
विवरे बुद्रुक येथील उपसरपंचांचा एका दिवसात राजीनामा
सरपंच युनूस तडवी यांच्याकडे उपसरपंच पदाचा राजीनामा सोपवतांना नवनिर्वाचित उपसरपंच भाग्यश्री पाटील

रावेर - Raver - प्रतिनिधी :

विवरे बुद्रुक येथील उपसरपंच निवडणुकीत शिवाजी पाटील व विपिन राणे गटाचा एक सदस्य विरोधी गटाला जाऊन मिळाल्याने,प्रतिस्पर्धी वासुदेव नरवाडे यांच्या गटाकडून भाग्यश्री पाटील यांनाच उपसरपंच करण्यात आले होते.

यानिवडीनंतर अनेक पडसाद उमटल्याने,अवघ्या एका दिवसातच भाग्यश्री पाटील यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा सदर केल्याने वासुदेव नरवाडे यांच्या गटाला मोठा झटका बसला आहे.

येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नुकतीच गुरुवारी निवड झालेल्या भाग्यश्री पाटील यांनी शुक्रवारी पंचायत समिती गटविकास अधिकारी व सरपंच विवरे बुद्रुक युनुस तडवीकडे उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आहे.

अवघ्या एका दिवसात राजीनामा दिल्याने,राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.गुरुवारी येथील ग्रामपंचायतीत सरपंच युनुस तडवी यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवड करण्यात आली होती.

यात वासूदेव नरवाडे यांच्या गटात ७ व विपिन राणे,शिवाजी पाटील यांच्या गटात ८ असे बलाबल असतांना,अचानक भाग्यश्री पाटील ह्या वासुदेव नरवाडे यांच्या गटात जाऊन मिळाल्याने,वासूदेव नरवाडे यांचे संख्याबळ ८ होवून,वासुदेव नरवाडे यांच्या बाजूने भाग्यश्री पाटील यांना ८ मते मिळून त्यांची उपसरपंच पदी वर्णी लागली.

तर विपिन राणे व शिवाजी पाटील यांनी उभे केलेले उमेदवार विनोद मोरे यांना ७ मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला होता.

या निवडणुकीनंतर गावात तीव्र पडसाद उमटल्याने शुक्रवारी भाग्यश्री पाटील यांनी त्यांचा राजीनामा गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल व शनिवारी सरपंच युनुस तडवीकडे सादर केला आहे.या खेळीने वासुदेव नरवाडे यांना जोरदार झटका बसला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com