दोघांनी कवटाळले मृत्यूला

नैराश्येमुळे वाढले शहरात आत्महत्यांचे प्रमाण
दोघांनी कवटाळले मृत्यूला

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

कोरोना संसर्गाच्या साथीमुळे मार्च महिन्यात राज्यासह जळगाव जिल्ह्याभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. मार्च महिन्यानंतर टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन वाढतच गेल्याने चार महिने रोजगारांसह उद्योग व्यवसायाला ठप्प झाले होते.

परिणामी रोजगारा अभावी कुटंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न निर्माण झाला. पती-पत्नीमध्ये गृहकलहाला सुद्धा तोंड फुल्याने नैराश्यातून आत्महत्या सारख्या घटना वाढू लागल्या आहेत.

गेल्या महिन्याभरात आत्महत्याचे सत्र सुरु असून शुक्रवारी जळगाव शहरातील खंडरावनगरातील एका 35 वर्षीय तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केली. तर दुसर्‍या घटनेत सासर्‍याकडे कामधंद्यासाठी आलेल्या विवाहित तरुणाने गळ्याला दोर लावून जीवनयात्रा संपविली.

एकाच दिवशी कौटुंबिक कलहातून दोन तरुणांनी आत्महत्या करुन मृत्यूला कवटाळले. तरुणांच्या वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा विषय ठरला आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com