हद्दपार केलेल्या तरुणास अटक
जळगाव

हद्दपार केलेल्या तरुणास अटक

हातात सुरा घेवून निर्माण करत होता दहशत

Rajendra Patil

जळगाव | प्रतिनिधी | Jalgaon

तांबापूरमधील हद्दपार एक तरुण शहरात विनापरवानगी फिरताना आणि हातात सुरा घेवून दहशत माजविताना आढळल्यामुळे त्यास एमआयडीसी पोलिसांनी २८ रोजी सायंकाळी साडेसात वाजता अटक केली.

अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या रिजवान ऊर्फ काल्या गयासोद्दिन शेख (वय २२, रा. अजमेरी गल्ली, तांबापूर) यास उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. परंतु, त्याने जिल्ह्यात विनापरवाना प्रवेश केला.

तो शिरसोली नाक्यावरील तांबापूर परिसरात सुरा घेवून दहशत माजवित असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनायक लोकरे यांना मिळाली. याबाबत लोकरे यांनी सहकार्‍यांना कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस तांबापूरमध्ये गेले असता, त्यांना शेख हा सुरा घेवून दहशत माजवित असताना आढळला. पोलिसांनी सुरा ताब्यात घेवून शेख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

शेख याला जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार केले आहे. मात्र, तो कोणतीही परवानगी न घेता शहरात फिरताना आणि हातात सुरा घेवून दहशत माजविताना पोलिसांना आढळला. यासंदर्भात कॉन्स्टेबल गोविंदा विश्राम पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरुन रिजवान ऊर्फ काल्या गयासोद्दिन शेख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहेत. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर, गोविंदा पाटील, सचिन पाटील, इम्रान सय्यद आदींनी आरोपीस जेरबंद केले.

Deshdoot
www.deshdoot.com