परिवहन विभाग तालुकानिहाय शिबिराचे आयोजन

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची माहिती
परिवहन विभाग तालुकानिहाय शिबिराचे आयोजन
USER

जळगाव - Jalgaon

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (Sub Regional Transport Office), जळगाव मार्फत जिल्ह्यातील नागरीकांसाठी दरमहा तालुकानिहाय मासिक शिबिराचे आयोजन करण्यात येते

माहे जुलै 2021 पासून प्रशासकीय कारणास्तव या शिबिर दौऱ्यात बदल करण्यात आला असून याची नागरीकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन माहिती श्याम लोही (Shyam Lohi), उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

जुलै, 2021 चे मासिक शिबीराचे कामकाज याप्रमाणे : अमळनेर Amalner - पहिला मंगळवार, जामनेर- दुसरा बुधवार, पाचोरा Pachora - पहिला सोमवार व चौथा सोमवार, भुसावळ- पहिला, तिसरा व चौथा गुरुवार, चाळीसगाव- पहिला, दुसरा, चौथा व पाचवा शुक्रवार, यावल Yaval - तिसरा सोमवार, सावदा - पहिला बुधवार, चोपडा Chopda - दुसरा सोमवार, रावेर Raver - दुसरा मंगळवार, बोदवड Bodwad - चौथा मंगळवार, भडगाव Bhadgaon - चौथा बुधवार, पारोळा - तिसरा शुक्रवार व पाचवा गुरुवार, मुक्ताईनगर Muktainagar- तिसरा मंगळवार, वरणगाव Varngaon - दुसरा गुरुवार याप्रमाणे दौरा राहील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी असलेला मासिक दौरा पुढील सुयोग्य दिनांकास आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल, अन्यथा रद्द करण्यात येईल. असेही श्री. लोही यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com