वीज कामगारांचे महावितरण परिमंडळ कार्यालयासमोर निदर्शने

वीज कामगारांचे महावितरण परिमंडळ कार्यालयासमोर निदर्शने

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

वीज कंपन्यातील कामगार व अभिंयते याना फ्रंट लाईन वर्कर घोषीत करुन सोईसुविधा द्या या मागण्यांसाठी दि.17 मे रोजी जळगांव शहरातील अयोध्यानगर येथील महावितरण परिमंडळ कार्यालय, विद्युतभवन जळगांव येथे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेऴी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे महावितरण जळगाव परिमंडळ सचिव कॉ.विरेंद्र पाटील यांनी शासनाच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचला. या कामगारांना कोणाचीही वैद्यकिय सुविधा उपलब्ध नसुन लस सुध्दा उपलब्ध होत नाही. असे असतानाही वीज कर्मचारी मात्र जिवाची पर्वा न करता कोरोना काळातही कर्तव्य बजावत आहे असे विरेंद्र पाटील म्हणाले.

वीज कामगार व अभिंयते याना सर्व सोई उपलब्ध करुन दयावे या एकमेव मागण्यांसाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी दि.17 मे रोजी दिवसभर सर्व केंद्रीय, झोनल, सर्कल, विभागीय व शाखा सचिवांनी आपल्या कार्यासमोर डिजीटल बनर, पोस्टर,कार्ड बोर्ड तसेच काळ्या फिती लावुन कोरोनाच्या नियमाचे पालन करत निदर्शने केली.

संध्या पाटील , केंद्रीय महिला कार्य. सदस्य, दिनेश बडगुजर सर्कल अध्यक्ष, प्रभाकर महाजन विभाग अध्यक्ष , ,किशोर जगताप यांनी सहभाग नोंदविला. परिमंडळ अंतर्गत जे एन बाविस्कर,पी वाय पाटील,नाना पाटील प्रकाश कोळी ,देविदास सपकाळे,अविनाश तायडे ,सागर कांबळे ,यांनी सभासदांसमवेत निदर्शने केली

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com