नाशिक-ओझर विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव द्या !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
नाशिक-ओझर विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव द्या !

जळगाव - Jalgaon

नाशिक (Nashik) येथील ओझर विमानतळाला (Ozark Airport) कर्मवीर दादासाहेब गायकवाड (Karmaveer Dadasaheb Gaikwad) यांचे नाव द्यावे, तसेच मागासवर्गीय कर्मचारी यांच्या पदोन्नतीबाबत राज्य सरकारचा ७ मे चा शासन निर्णय रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालया (Collector's Office) समोर कर्मवीर दादासाहेब गायकवाड नामांतर कृती समितीतर्फे निदर्शने करण्यात आली.

तसेच मागणीचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात नाशिक विमानतळ नामांतर कृती समितीचे अध्यक्ष मुकूंद सपकाळे, सचिव भारत ससाणे, अमोल कोल्हे, हरिश्चंद्र सोनवणे, ॲड. अभिजीत रंधे, प्रा.प्रितीलाल पवार, भारत सोनवणे, चंदन बिर्‍हाडे, संजय सपकाळे, किरण सोनवणे, नाना मगरे, समाधान सोनवणे, अॅड. अभिजित रंधे, सचिन बिर्‍हाडे, राजू मोरे, पिंटू सपकाळे, दिलीप सपकाळे, रमेश सोनवणे, विनोद सुर्यवंशी, जयपाल धुरंधर, महेंद्र केदारे, आकाश सपकाळे, डीगंबर सोनवणे, बापू निकम, विकास मोरे, दिपक बाविस्कर, गौतम सोनवणे, कृष्णा सपकाळे, गौतम पानपाटील, संयज बागुल, गुरूनाथ सैंदाणे, जयपाल धुरंधर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com