रेल्वे मालधक्का अन्यत्र हलवण्याची मागणी
जळगाव

रेल्वे मालधक्का अन्यत्र हलवण्याची मागणी

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

भोईटेनगर लगतचा रेल्वे मालधक्का शहराबाहेर हलविण्याची मागणी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांचेसह परिसरातील नागरिकांनी केली असून याबाबत महापौरांकडे नुकतेच पत्र सादर केले. तसेच हा विषय आगामी महासभेत पटलावर ठेवण्यात यावा असेही उपमहापौर सोनवणे यांनी पत्रकात म्हटले आहे.

भोईटेनगर लगत रेल्वे मार्गावर रेल्वेचा मालधक्का आहे. गेल्या अनेक वषार्ंपासून या मालधक्क्याचे येथे काम चालते. प्रभाग 6 मध्ये हा मालधक्का असून हा दाट वस्ती व लोकवस्तीचा परिसर आहे. येथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर या मालधक्क्याचा त्रास होत असून हा त्रास वर्षानुवर्षे सहन करावा लागत आहे.

याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आला असून आता निर्णय घेण्याची वेळ मनपावर आलेली आहे. मनपाने निर्णय घ्यावा, रेल्वे विभा व अन्य संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करण्याचीही आवश्यकता आहे. याकरीता हा विषय महासभेपुढे घ्यावा असेही त्यांनी म्हटले. मालधक्का हा भोईटेनगर, दूध फेडरेशन वस्ती, म्हाडा कॉलनी, भिमचंद जैन नगर आदी परिसरातील नागरिकांना अनेक वर्षापासून त्रासदायक ठरत आहे. या मालधक्क्यावर विविध प्रकारच्या धान्याच्या पोत्याची तसेच खते, सिमेंट गोण्यांची नेहमीच लोडींग, अनलोडींग करण्यात येत असते. यामुळे परिसरात सतत धुराळा उडत असतो, धान्य आदीमुळे वारंवार चिलटे, डासाचा प्रादुर्भाव होत असतो. तसेच काही केमिकलयुक्त धुराळ्यामुळे डोळ्यांना इजा होते, आबाल वृध्दांना त्रास होत असतो.

दररोज किमान 500 ते 600 रेल्वेगाड्या, ट्रॅक्स हे धान्य, सिमेंट, खतांनी भरलेल्या गाड्या येथे ये जा करतात तसेच रिंगरोडवर अवजड वाहनांना प्रवेश बंदी असूनही या वाहनांची अद्यापही वाहतूक सुरूच आहे. या वाहनांचे कर्कश आवाज, वाहनांची खडखड यास परिसरातील नागरिक वैतागले आहेत. तर काहींना आवाजाचा प्रादुर्भावही होत असतो, अवजड वाहनांना प्रवेश बंद बाबत मनपा सभेत ठरावही पास झालेला आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. याकरीता हा विषय महासभेत पटलावर ठेवण्यात यावा असेही पत्रकाद्वारे उपमहापौरांनी मागणी केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com