प्रशासनाने वाजवला कारवाईचा बॅन्ड

लग्नात क्षमतेपेक्षा जास्त वर्‍हाडी जमविल्याने ५० हजारांचा दंड, कमलशांती लॉन्सवर गुन्हा दाखलची मागणी
प्रशासनाने वाजवला कारवाईचा बॅन्ड

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

कोरोना साखळी तोडण्यासाठी सद्या लॉकाडाऊन चालू आहे. यात लग्नासाठी फक्त २५ लोकांची संख्या ठरवून दिलेली असतानाही चाळीसगांव शहरा लगत असलेल्या कन्नड रस्त्यावरील कमलशांती या भव्य लॉन्समध्ये शासनानाच्या नियामाचे उल्लघन करुन, तब्बल १६० ते १६५ वर्‍हाडी मंडळी उपस्थित लग्नसोहळा होत असतानाच, महसूल, नगर परिषदे व पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकुन, लग्न सोहळाचे आयोजन करणार्‍या वधु-वर आशा दोघांना मिळुन तब्बल ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. शहरात प्रथम ५० हजारांचा दंडा ठोठवल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लॉन्स सील करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. परंतू लॉन्स मालकावर गुन्हां दाखल का? करण्यात आला नाही असे प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

लग्न कार्यातील वर्‍हाडी संख्या २५ च्या संख्येने ठरवून दिलेली असतांना आज कमल शांती लॉन्समध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील लासुर या गावातील लग्न सोहळा क्षमतेपेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीत होत असल्याची माहिती मिळाल्यानतंर शैलेंद्र परदेशी, पोलीस प्रशासनातील ए. पी.आय. महावीर जाधव, पो. कॉ. गणेश पाटील, पो. कॉ. संभाजी पाटील, तसेच न. पा. प्रशासनातील अभियंता अभियंता कुणाल महाले, दिनेश जाधव, प्रविण तोमर, जितेंद्र जाधव, संजय देशमुख, प्रशांत सोनवणे, प्रसाद बाविस्कर आणि सुमित सोनवणे यांना मिळाल्यानंतर दुपारी कमलशांती लॉन्समध्ये सुरु असलेल्या विवाह सोहळ्या प्रसंगी वरील पथकांनी टाकलेल्या छाप्यात जवळपास १६० ते १६५ वर्‍हाडी मंडळी उपस्थित असल्याचे आढळून आले.

या सोहळ्यातील आयोजक संजय सुदर्शन जैस्वाल रा. लासूर ता. गंगापूर जि. औरंगाबाद यांच्याकडून ५० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. मात्र ज्या लॉन्समध्ये हा विवाह सोहळा शासनाने ठरवून दिलेल्या नियमांची पायमल्ली करीत पार पाडला जात होता अशा लॉन्स चालकाला मात्र क्लिनचिट मिळाल्याचेही समजते. कमलशांती लॉन्स हे सुभेष बोहरा नावाच्या व्यक्तीचे असल्याची माहिती मिळाली आहे. वास्तविक यापूर्वीच प्रशासनाने शहर आणि परिसरातील मंगल कार्यालय, लॉन्स अशा सर्वांनाच शासनाच्या आदेशाची जाण आणि उल्लंघन केल्यास होणार्‍या परिणामांची जाण करुन देणार्‍या नोटीसा बजावल्या असल्याचे सांगीतले जाते. असे असतांना देखील कमलशांती या शहराबाहेरील प्रमुख रस्त्यांवर क्षमतेपेक्षा जास्त वर्‍हाडी मंडळी लग्नात लॉन्समध्ये घेतल्यामुळे कमलशांतीचे लॉन्स सील करण्यात आले असून परवाना देखील तात्पूरता रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. परंतू लॉन्सच्या मालकावर गुन्हां दाखल करुन त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com