रोटरीच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य गरजूंपर्यंत पोहचवा

रोटरी क्लब ईलाइटच्या समारंभात प्रांतपाल मेहर यांचे आवाहन
रोटरीच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य गरजूंपर्यंत पोहचवा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

रोटरीच्या (Rotary) माध्यमातून समाजहिताचे कार्य, मदत गरजूंपर्यंत (social welfare work) पोहचवा. गरजूंना मिळालेल्या सुविधेमुळे त्यांच्या चेहर्यावरील समाधान आणि दुसर्यांसाठी काही तरी चांगले काम केल्याचा आनंद वेगळाच असतो. या सामाजिक कार्याच्या सुखा, समाधानाचे धनी व्हा, असे आवाहन रोटरी क्लब जळगाव ईलाइटच्या ( Rotary Club of Jalgaon Elite ) ऑफिशियली क्लब व्हिजिटप्रसंगी प्रांतपाल रमेश मेहर (Ramesh Mehr) (नाशिक) यांनी केले.

मायादेवीनगरातील रोटरी सभागृहात कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर मेहर यांच्यासह सहाय्यक प्रांतपालक विष्णू भंगाळे, क्लबचे अध्यक्ष नितीन इंगळे, सचिव संदीप असोदेकर उपस्थित होते.

प्रांतपाल मेहर यांनी जळगाव दौर्याप्रसंगी रोटरी क्लब जळगाव ईलाइटला भेट दिली.

क्लबच्या कार्याचा आढावा घेतला. मेहर यांनी क्लबच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पदाधिकारी यांचा गौरव केला. तर नूतन सदस्य व रोटरी क्लब जामनेर ईलाइट या सॅटेलाइट, चॅर्टर क्लबचे अध्यक्ष डॉ.अमोल सेठ यांच्यासह नूतन पदाधिकारी यांचे स्वागत केले. जामनेरचा सॅटेलाइट क्लब सुरू करण्याचा पहिला बहुमान रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 मध्ये नाशिक ते नागपूर दरम्यान मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com