राजकीय दबावापोटी दीपनगर प्रकल्प रेंगाळण्याची स्थिती

राजकीय दबावापोटी दीपनगर प्रकल्प रेंगाळण्याची स्थिती
दीपनगर

फेकरी Fekri ता.भुसावळ -वार्ताहर

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र (Bhusawal Thermal Power Station) मधील660 मेगावट प्रकल्प मोठ्या प्रयत्नांनी दीपनगर येथे आंदोलने केल्यामुळे मंजूर झाला. त्यानंतर हा प्रकल्प (Project ) सुरू करण्यास अनेक अडचणीमुळे विलंब (Delay) झाला.

कोरोना काळात संपूर्ण काम बंद असल्याने वेळेवर हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही तरी ही येथील अधिकारी सर्वांना सोबत घेऊन प्रकल्पाला गती देत असताना काही राजकीय वारंवार वेगवेगळ्या कारणास्तव अधिकार्‍यांवर दबाव आणून कामात व्यत्यय आणण्याचे काम करीत आहेत. स्थानिक प्रश्नावर खा. रक्षा खडसे यांनी काही दिवसांपूर्वी प्रकल्प सहा महिने बंद ठेवला तरी काही हरकत नाही असे उद्गार काढलेले होते.

खा. खडसे हे वेगवेगळे विषयात अभ्यासपूर्ण मत मांडत असताना होणार्‍या दुष्परिणामांवर त्यांनी कोणताही विचार केलेला दिसून येत नाही. सदर प्रकल्प सहा महिने बंद राहिल्यास कंत्राटी कामगारांवर व त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ येणार असून प्रकल्पालाही उशीर झाल्याने अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्रकल्पात पाहिजे तेवढा स्टाफ नसल्यामुळे अधिकार्‍यांवर आधीच तनाव असून यापूर्वीही अशा दबावामुळे तत्कालीन मुख्य अभियंता अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यभार करत असताना त्यांची बदली करण्यात आली होती.

अशा गंभीर प्रश्नावर राजकीयांनी विकासाच्या दृष्टीने विचार करणे गरजेचे असून दुर्देवाने अशाच पद्धतीचा दबाव तंत्र सुरू राहिल्यास या अन्यायाविरुद्ध राष्ट्रीय ट्रेड युनियनने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com