दीपनगर, ता. भुसावळ Bhusawal - वार्ताहर :

तालुक्यातील दीपनगर प्रकल्पाच्या मुख्य अभियंतापदी खापरखेडा विजनिर्मिती प्रकल्पातील उपमुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

तर येथील मुख्य अभियंता राजू घुगे यांना खापरखेडा येथे उचलबांगडी करण्यात आली आहे. तत्कालीन मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्या बदलीनंतर घुगे यांनी पदभार घेतला होता.

तब्बल पाच महिन्यांच्या कार्यकाळानंतर त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. तसेच तात्काळ कार्यस्थळी हजर होण्याचे आदेश महाजनकोचे कार्यकार संचालक (मांस) भि. य. मंता यांनी १८ रोजी दिले आहे.