विषम हवामानामुळे भाजीपाला उत्पादनात घट
जळगाव

विषम हवामानामुळे भाजीपाला उत्पादनात घट

मागणीप्रमाणे पुरवठा नसल्याने भाजीपाल्याचे भाव भिडले गगनाला

Rajendra Patil

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यात सद्यस्थितीत बर्‍याच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पर्जन्यमान सुरू आहे जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या सुमारे 51 टक्के पर्यंत पर्जन्यमान झाले असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे परंतु जिल्ह्यात सद्यस्थितीत दमट काहीसे रोगट हवामान असून भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे त्यामुळे बाजारात मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने कांदा पत्ताकोबी वगळता इतर भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत त्यामुळे गृहिणींचे स्वयंपाक घराचे अंदाजपत्रक कोलमडले आहे.

तसेच दुसरीकडे सद्यस्थितीत कोरोना प्रादुर्भावामुळे बर्‍याच खाजगी आस्थापनांमध्ये असलेल्या कुटुंब प्रमुखांचे नोकरीचे अस्तित्वच धोक्यात असल्याने तर काही ठिकाणी वेतनच मिळत नसल्याने उदरनिर्वाहाचे साधन संपुष्टात आले आहे त्यामुळे देखील गृहिणींना घरखर्च कसा चालवावा यांचे संकट भेडसावत असल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यात वावडदा शिरसोली म्हसावद तसेच इतर ग्रामीण भागात भाजीपाला वर्गीय उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी जूनच्या दुसर्‍या सप्ताहात बर्‍यापैकी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत भाजीपाला उत्पादनची आवक बर्‍यापैकी होती त्यामुळे दर देखील स्थिर होते. परंतु गेल्या पंधरा वीस दिवसांपासून दमट, रोगट हवामान, तसेच रिपरिप व कमी-जास्त पावसामुळे भाजीपाल्याची वाढ खुंटून मोठ्या प्रमाणावर पिवळा पडला आहे त्यामुळे जून महिन्याच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक गेल्या पंधरा दिवसांपासून कमी झाली आहे त्यामुळे बहुतांशी भाजीपाल्याचे दर 30 ते 50 टक्क्यांनी वाढले आहे.

पूर्वी 15 ते 20 रुपये किलो दराप्रमाणे टोमॅटो बटाटे उपलब्ध होते ते आज 30 ते 40 रुपये प्रति किलो दराने मिळत आहेत तर सिमला मिरची 50 रुपये, तर साधी मिरची देखील 40 रुपये, वांगे दोडकी गिलके सह इतर भाजीपाला देखील 30 रुपये प्रति किलोच्या पुढे मिळत आहे गेल्या पंधरा वीस दिवसांपासून भाजीपाल्याच्या दरात सुमारे पंधरा ते वीस रुपयांच्या पुढेच दरवाढ झाली आहे.

बाजारपेठेत भाजीपाल्याचे उत्पादन आवक कमी-अधिक प्रमाणात असली तरी सद्यस्थितीत जून महिन्यापूर्वी सलग दोन ते अडीच महिने जिल्हा प्रशासनाकडून लोकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत होती. त्यामुळे बर्‍याच भाजीपाला विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे देखील सद्यस्थितीत भाजीपाला विक्रेत्यांकडून छुप्या पद्धतीने भाजीपाल्याचे दर वाढविले जात असावेत असे एका ग्राहकाने सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com