पारोळ्यात कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या
जळगाव

पारोळ्यात कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

शहरातील मडक्या मारुती भागातील शेतकरी हिरामण बाबुराव बारी (70) यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून काही तरी विषारी द्रव पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

येथील शहरातील मडक्या मारुती भागातील रहिवासी हिरामण बाबुराव बारी हे वंजारी खु भागात असलेली शेतीत मका व गहू पेरणी केली होती. ते नेहेमी प्रमाणे दिनांक 7 रोजी दुपारी 4 वाजता शेतात गेले होते सायंकाळी उशिरा पर्यंत ते घरी न परतल्याने त्यांचा लहान मुलगा देविदास हा वडील शेतातून का आले नाही.

म्हणून तो त्यांना पाहण्यासाठी शेतात गेला तर वडील शेतात असलेल्या घराच्या ओट्यावर पडले दिसले .त्यांच्या नाका तोंडातून फेस येत होता. देविदास हा घाबरला व रिक्षाने उपचारासाठी पारोळा कुटीर रुग्णल्यात आणले वैदकीय अधिकारी डॉ योगेश साळुंखे यांनी शर्थी चे प्रयन्त केले. पण उपचार दरमान्य त्यांचा मृत्यू झाला.

हिरामण बारी हे गेल्या अनेक दिवसांपासून वैफल्य ग्रस्त अवस्थेत होते या वर्षी हाताचा सर्व हंगाम गेल्या निराशा आली होती .त्यांच्या वर हात उसनवारी चे 78 हजार खाजगी बँकेचे व विकासो चे 75 हजार असे कर्ज होते .आणि या कर्जबाजारी पणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली त्यांच्या पच्यात पत्नी ,तीन मुली तीन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे .

त्यांचा वर दिनांक 8 रोजी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .पारोळा पोलीस ठाण्यात सुनील बारी यांच्या खबरी वरून आकस्मित मृत्यू चि नोद करण्यात आली तपास पो हे कॉ बापूराव पाटील हे करीत आहे .

Deshdoot
www.deshdoot.com