जळगाव : कारच्या धडकेतील जखमी तरुणाचा मृत्यू
जळगाव

जळगाव : कारच्या धडकेतील जखमी तरुणाचा मृत्यू

खासगी दवाखान्यात अन्य दोघांवर उपचार

Rajendra Patil

जळगाव | प्रतिनिधी Jalgaon

भरधाव कारने दिलेल्या धडकेतील जखमी मोटारसायकलस्वाराचा रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना खासगी दवाखान्यात मृत्यू झाला. तर अन्य दोघांवर उपचार सुरू आहे.

विठ्ठलपेठमधील सचिन अनिल सोनार (वय २८) हा तरुण बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास महाबळमध्ये भाचीला घेण्यासाठी मोटारसायकल (क्र.एमएच १९, ७८७६) ने नेरी नाक्यावरील रस्त्याने जात होता. यावेळी त्याच्या मोटारसायकलचे पेट्रोल संपले. त्यामुळे सचिन सोनार याने त्याचा मित्र पवन गोपाळ बारी व रोशन शरद ढाके यांना मोबाइलवर संपर्क साधून बोलावले ते दोन्ही मित्र मोटारसायकल (क्र.एमएच १९ बीव्ही ००२४) ने ट्रिपल सीटने निघाले. ते नेरी नाका चौकातून पांडे डेअरी चौकाकडे जात असताना कोंबडी बाजाराकडून भरधाव जाणार्‍या कार (क्र.एमएच १९ सीव्ही ६६५१) ने मोटारसायकलला धडक दिली.

या अपघातात मोटारसायकलवरील तिघं जण जखमी झाले. त्यांना खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. जखमींमधील पवन बारी यांची तब्बेत चिंताजनक होती. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसात नोंद झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com