कानबाई विसर्जनासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
जळगाव

कानबाई विसर्जनासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

भोकरबारी धरणात घडली घटना

Rajendra Patil

पारोळा - श. प्र. Parola

तालुक्यातील भोकरबारी येथील एका 16 वर्षीय विद्यार्थी कानबाई विसर्जनासाठी गेला असता भोकरबारी धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दि.२७ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.

काल घरी कानबाई बसविण्यात आल्या होत्या, त्या आज दिनांक 27 रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास भोकरबारी धरणात वाजत-गाजत विसर्जनासाठी घेऊन जाणारा रोहित रावसाहेब पाटील हा कानबाई मातेचे विसर्जन करीत असताना त्याचा धरणात पाय घसरून पाण्यात पडून बुडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली.

रोहितचे वडील यापूर्वी मयत झाले असून तो यावर्षी एन.ई.एस.बॉईज हायस्कुल येथे दहावीला शिकत होता. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल प्रकाश चौधरी हे करीत आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com