पाटणादेवीच्या जंगलात आढळला महिलेचा मृतदेह
जळगाव

पाटणादेवीच्या जंगलात आढळला महिलेचा मृतदेह

घात-पाताची शक्यता ?

Manohar Kandekar

चाळीसगाव - chalisgaon - प्रतिनिधी :

तालुक्यातील पाटणादेवी जंगलातील चंडीकावाडी शिवारातील घोडीघाटात काल एका तीस वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह झाडाला फास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, चंडीकावाडी शिवारातील घोडीघाट भागात डोंगराच्या पायथ्याशी काल रोजी दुपारी अनोळखी महिलेचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

सदर अनोळखी महिलेचा मृतदेह गेल्या आठ ते दहा दिवसांपासून झाडावर लटकलेल्या अवस्थेत असावा अशी शक्यता असून ही अनोळखी मयत महिला कोण? ती तेथे कशी आली? तिने आत्महत्त्या केली की तिचा घात पात झाला, असा संशय व्यक्त केला जात आहे.

याबाबतची खबर पो.पा.अमोल चौधरी यांनी ग्रामीण पोलीसांत दिल्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस परीसरात तसेच अन्य तालुक्यात कोठे मिसींग दाखल आहे का? या दृष्टीने तपास करीत आहे. पुढील तपास पो.नि.प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ.दिपक ठाकूर हे करीत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com