चक्रीवादळाचा तडाखा ; रावेर तालुक्यातील तापी पट्ट्यात केळी बागा भुईसपाट

गारपीट,पाऊस,वादळाने अनेक घरांचे नुकसान
चक्रीवादळाचा तडाखा ; रावेर तालुक्यातील तापी पट्ट्यात केळी बागा भुईसपाट
ऐनपूर येथे वादळाने विजेच्या डीपी वर झाड पडल्याने झालेले नुकसान

रावेर|प्रतिनिधी Raver

तालुक्यातील विटवा,ऐनपूर,निंबोल, खिर्डी,सुलवाडी,वाघाडी,रेंभोटा यासह परिसरात आज दुपारी झालेल्या वादळाने अनेक केळी बागा भुईसपाट झाल्या आहे.याशिवाय अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे.वादळाने वीज तारांवर व पोलवर झाडे उन्मळून पडल्याने या भागातील वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे.

ऐनपूर येथे वादळाने विजेच्या डीपी वर झाड पडल्याने झालेले नुकसान
आरोग्यमंत्री म्हणाले, लॉकडाऊन राहणारच फक्त शिथिलता देणार

आज गुरुवारी दुपारी आलेल्या वादळासह विटवा, ऐनपूर परिसरात गारपीट होऊन केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामुळे करोडो रुपयांच्या केळी बागा जमीनदोस्त झाल्या आहे.अनेक ठिकाणी वादळाच्या तडाख्याने घरांवरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे.सुलवाडी व चिंच फाटा या रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक देखील ठप्प झाली आहे.तापी पट्ट्यात यामुळे केळी उत्पादकांचे कंबरडे उडले असून,शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी होत आहे.तर तालुक्यात बहुतांशी भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे.

ऐनपूर येथे वादळाने विजेच्या डीपी वर झाड पडल्याने झालेले नुकसान
...तर तुम्हाला टोल भरावा लागणार नाही
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com