चाळीसगावात संचारबंदी धाब्यावर; लोक रस्त्यावर

पोलिसांच्या वारंवार सूचना , नागरिकांना लाठीचा प्रसाद देण्याची वेळ आली
चाळीसगावात संचारबंदी धाब्यावर; लोक रस्त्यावर

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने १५ दिवसांची कडक संचारबंदी लागू केली असून या कालावंधीत विनाकाराण बाहेर फिरणार्‍यांवर कठोर निबर्ंध लागू केले आहेत. मात्र चाळीसगावात आज संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी संचारबंदीचे सर्व नियम धाब्यावर बसवत, रस्त्यांवर खुलेआम फिरत मोठ्या प्रमाणात संचारबंदीचे उल्लघन केल्याचे आढळून आले.

शहरातील अनेक ठिकाणी फळ विके्रते भाजी विके्रत्यांनी दुकाने थाटली. रिक्षा, मोटरसायकली धावत होत्या. कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी संचारबंदी असतांनाही लोक घरातून बिनधास्तपणे बाहेर पडत होते. पोलिसांच्या व्हॅन रस्त्याने वारंवार सूचना देवून लोक ऐकत नसल्याचे दिसून आले. नागरिक ऐकत नसल्याने प्रशासनाला अधिक कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे बंद केली आहे. तसेच सवलत दिलेल्या सेवा रोज सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहणार आहेत. लोकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घरातून बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र आज संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी सकाळ पासून शहरातील बहुतांश दुकाने बंद असली तरी लोकांची रस्त्यावरील ये जा मोठ्या प्रमाणात सुरु होती.

शासनाच्या निर्बंधाला लोक जुमानतांना दिसत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातून आधिक कुमक मागवून नागरिकांना लाठीचा प्रसाद देण्याची वेळ आली आहे. तरच कोरोनाची साखळी तोडण्यास आपण यशस्वी होवू.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com