श्रमदानातून तरुणांमध्ये सेवाभाववृत्तीची जोपासना-वृक्षमित्र अरुण निकम

श्रमदानातून तरुणांमध्ये सेवाभाववृत्तीची जोपासना-वृक्षमित्र अरुण निकम

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी-

श्रमदान आणि सेवाभाव Labor and service वृत्तीतूनच आपला , समाजाचा व देशाचा विकास Development of the country होईल. श्रमप्रतिष्ठेशिवाय शिक्षणाला Education अर्थ प्राप्त होत नाही. श्रममूल्ल्यांची खर्‍या अर्थाने जोपासना झाली पाहिजे, श्रमदानातून तरुणांमध्ये सेवाभाववृत्ती प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन रा.शि.संस्थेचे सचीव वृक्षमित्र अरुण भीमराव निकम Arun Bhimrao Nikam केले.

शहरातील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना आणि नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यापीठस्तरीय आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शिबिराच्या समारोप प्रसंगीते ते बोलत होते.

व्यासपीठावर प्रमुख अतिथी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, सौ.प्रतिभा मंगेश चव्हाण, योजनाताई पाटील, प्राचार्य डॉ. एस.आर. जाधव तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ रासेयो सल्लागार सदस्य,डॉ. प्रशांत कसबे, संचालक रासेयो कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे डॉ. पंकजकुमार नन्नवरे, उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.डी.महाजन,उपप्राचार्य डॉ.यू.आर.मगर, उपप्राचार्य डॉ. जी.डी. देशमुख, प्रा.डॉ. आर. पी.निकम, प्रा. डॉ.ए.एल. सूर्यवंशी, प्रा.डॉ. सौ.नन्नवरे आदि उपस्थित होते.

पुढे बोलतांना वृक्षमित्र अरुण निकम म्हणाले की, जीवन जगण्याची अनेक उदाहरणे गीतेमध्ये आहेत. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने गीता वाचन केलीच पाहिजे. गीता हा जगातला सर्वश्रेष्ठ असा ग्रंथ आहे. आपल्या परिसरातील पूरग्रस्त भागात विद्यार्थ्यांनी खेडोपाडी जाऊन जे श्रमदान केले. लोकांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यांना मानसिक आधार दिला त्याबद्दल त्यांचे विशेष कौतूक आहे.

प्रमुख अतिथी मा.दिलीप रामू पाटील म्हणाले की, निसर्गावर कोणीही मात करू शकत नाही, परिसरात जे संकट आलेले आहे, त्यासंकटाचे निवारण करणे आपल्यासमोर आव्हान आहे, तेथील जनतेचे संसार, शेतीपिके ,पशूधन होत्याचे नव्हते झाले. त्यांना उभे करण्यासाठी व धीर देण्यासाठी आपल्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी जे प्रयत्न केले ते नक्कीच कौतुकास्पद आहे. या चार दिवसीय शिबिरातील स्वयंसेवकांनी वाकडी, बायपास रोड ते पाटणा पिंपरखेड, पिंपरखेड तांडा,वाघडू येथे स्मशानभूमीची स्वच्छता,रस्ते दुरुस्ती, नालेसफाई, चिखल-गाळ, कचरा काढणे वगैरे श्रमदान करून, पूरग्रस्त आदिवासीं बांधवांच्या,शेतकर्यांच्या भेटी घेऊन त्यांचे दु:ख,वेदना समजून घेतल्या,व त्याना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन शिबीर यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. बी.पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.संजय गोपाळराव देशमुख, संस्थेचे सचिव वृक्षमित्र अरुण भीमराव निकम, सहसचिव संजय रतनसिंग पाटील, तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक, पदाधिकारी, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर.जाधव, उपप्राचार्य प्रा. डॉ.एस.डी. महाजन, उपप्राचार्य प्रा.डॉ.यु. आर. मगर, उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. डी. देशमुख यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.पंकजकुमार नन्नवरे, प्रा. डॉ. ए. एल. सूर्यवंशी, प्रा. डॉ. आर. पी.निकम, प्रा.मंगला सूर्यवंशी, प्रा.एच.आर.निकम, प्रा.के.पी.रामेश्वरकर, ए.बी.सूर्यवंशी, एन.एस.कांबळे, मंगेश देशमुख , रावसाहेब त्रिभुवन, राजू गायकवाड, कैलास चौधरी यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रा.डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. आर. पी. निकम यांनी केले. तर आभार प्रा.डॉ. ए.एल. सूर्यवंशी यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com