अक्षय्य तृतीया, रमजानच्या खरेदीचा उत्साह

बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा मात्र पडला विसर
अक्षय्य तृतीया, रमजानच्या खरेदीचा उत्साह

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरु असून वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा वगळल्या तर इतर सर्व दुकाने बंद आहेत.

मात्र, अक्षयतृतीया आणि रमजान ईदचा सणानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून तीन दिवस विशेष सूट देण्यात आली आहे. अक्षयतृतीया, रमजान ईदच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी सकाळी 7 ते 12 वाजेदरम्यान शहरातील सुभाष चौक, महात्मा गांधी मार्केट, घाणेकर चौक परिसरासह मुख्यबाजारपेठेत नागरिकांची एकच झुंबड उडाली.दरम्यान, बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे कोरोनाची खरेदी तर केली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

आंब्यांनी भाव खाल्ला

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीया सण साजरा करण्यासाठी हिंदू धर्मात अक्षयतृतीयेला विशे महत्व आहे. अक्षयतृतीयेला नागरिकांकडून या दिवशी घागरीचे पूजन करुन पुर्वजांचे स्मरण करण्याची परंपरा चालत आली आहे. आजही परंपरा जोपासण्यासाठी हिंदूबांधव बाजारात दाखल होऊन घागर, आंबे यासह विविध वस्तूंची खरेदी केली. शहरातील मुख्य भागात विक्रेत्यांनी सकाळपासून आपली दुकाने थाटली होती. घागर 60 रुपयांपासून ते 150 रुपयांपर्यंत तर आंबे 50 ते 150 रुपये किलो रुपये प्रमाणे विक्री करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत नागरिकांना खरेदीसाठी सूट देण्यात आली होती. त्यामुळे बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.

शेवया, सुकामेवाला विशेष मागणी

रमजानचा ईदचा पवित्र सण देखील शुक्रवारी येत असल्याने मुस्लिम बांधव ईदचा सण साजरा करण्यासाठी पूर्वसंध्येला शहरातील बाजारात ठिकठिकाणी दुकाने थाटली होती. शिरखुरम्यासाठी लागणारा शेवया, सुकामेवा यासह विविध वस्तुंची खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केली होती.लॉकडाऊनमुळे बाजारपेठील इतर दुकाने बंद आहे. मात्र, विक्रेत्यांकडून छुप्या पद्धतीने बाजारपेठेत कपड्यांची विक्री केली जात असून यंदा देखील मुस्मिल बांधवांना ईद साध्या पद्धतीने घराघरात साजरी करावी लागणार आहे.

शहरातील सुभाष चौक. महात्मा गांधी मार्केट, शनिपेठ परिसरातील भाग, ईस्लाम पुरा यासह मुख्य चौकात सार्वजनिक ठिकाणी भरणार्‍या बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू ू नये म्हणून शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, नागरिकांकडून कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून खरेदीसाठी सकाळपासूनच बाजारपेठेत प्रचंड गर्दी केली जात हेती. त्यामुळे कोरोना नियमाचा फज्जा उडाला.

पोलीस प्रशासनाने केले आवाहन

अक्षय्य तृतीया आणि रमजान ईद हे दोन्ही सण एकत्र आल्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर कडक निर्बंध लागू केले असलेतरी जिल्हा प्रशासनाने दोन दिवस सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत खेरदीसाठी मुभा दिली होती. तसेच नियमांचे पालन करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. परंतू बाजारपेठेत कोणत्याही नियमांचे पालन केले गेले नसल्याने आणि दिलेल्या निर्धारीत वेळेपेक्षा बाजार सुरु असल्याचे शहर आणि शनिपेठ पोलिसांच्या माध्यमातून नागरिकांसह विक्रेत्यांना दुकाने बंद करण्यासंदर्भात आहवान केले आहे.

एकत्रित सणांचा योगायोग

14 मे रोजी अक्षयतृतीया आणि रमजान ईद सण यावर्षी एकाच दिवशी आल्याने अनेक वर्षांनंतर हिंदू-मुस्लिम एकत्र सणाचा हा योगायोग जुळून आला आहे. हे दोन्ही सण मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यासाठी हिंदू-मुस्लिम बांधवांनी पूर्वतयारी केली आहे. यंदा या दोन्ही सणावर कोरोना महामारीचे सावट असल्याने कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करुन घराघरातच हे सण साजरे करावे लागणार आहे.

छुप्या पद्धतीनेही विक्री

चप्पल,रुमाल,कपड्यांसह इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी सकाळपासून बाजारपेठेत नागरिकांसह महिलांची प्रचंड गर्दी होत आहे. जीवनावश्यक वस्तूबरोबरच इतर वस्तूंचीदेखील शहरात छुप्या पद्धतीने विक्रेते व्यवसाय करीत असल्याने चित्र दिसून आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com