बंदीनंतरही आठवडे बाजार

कासमवाडीत बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
बंदीनंतरही आठवडे बाजार

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून आठवडे बाजाराला बंदी घालण्यात आली आहे. मात्र विक्रेत्यांकडून प्रशासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवित सर्रासपणे शनिवारी आठवडे बाजार भरवित आहे.

त्यामुळे बाजारपेठेत प्रचंड गर्दी होत असल्याने कोरोनाचे सर्व नियमांना विक्रेत्यांसह नागरिकांकडून हरताळ फासले जात आहे.

पहिल्या लाटेत निर्बंधांमध्ये शिथीलता दिल्यामुळे जिल्ह्याला दुसर्‍या लाटेचा सामना करावा लागला होता. पहिली लाट ओसल्यानंतर बाजारपेठांध्ये प्रचंड गर्दी होवू लागली. त्यातच लग्नसमारंभ व आठवडे बाजारांना देखील मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली.

यामुळे नागरिकांनी मास्क वापरासह सोशल डिस्टन्सींचा फज्जा उडविला. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट तीव्र स्वरुपात आली. मात्र प्रशासनाने आठवडे बाजारांसह आता लग्नसमारंभासह राजकीय व सांस्कृतीक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली.

मात्र शासनाने बंदी घालून देखील नागरिक प्रशासनाच्या नाकावर टिच्चून शहरात आठवडे बाजार भरवित असून त्याठिकाणी खरेदीसाठी नागरिक प्रचंड गर्दी करीत असल्याचे चित्र शनिवारी कासमवाडी परिसरात भरलेल्या आठवडे बाजारात दिसून आले.

नियमांची अंमलबजावणी आवश्यक

शहरात अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नसल्याचे सांगत देशात तिसर्‍या लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जरी दुसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाने घातलेल्या निर्बंधात सुट मिळाली तरी कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पुढकार घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा तिसर्‍या लाटेमुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

मनपाचा कानाडोळा

आठवडे बाजारासह गर्दी होणार्‍या ठिकाणांवर लक्ष ठेवण्यसाठी जिल्हाधिकार्‍यांनी मनपा प्रशासासहन स्थानिक स्वराज्य संस्थेना जबाबदारी सोपविली आहे. मात्र शहरात भरणार्‍या बाजारातील गर्दीवर महापालिका प्रशासनाकडून सर्रासपणे कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच कोरोनाची तिसरी लाट आल्या शिवाय राहणार नाही.

दुर्लक्षामुळे तिसर्‍या लाटेचा धोका

आठवडे बाजारात सकाळपासून विक्रेत्यांसह खरेदी करण्यांची प्रचंड गर्दी होत असते. याठिकाणी विके्रते व नागरिकक तोंडाला मास्क देखील लावत नसून सोशल डिस्टन्सच्या नियम तर पुर्णपणे धाब्यावर बसवित आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाटेची शक्यता वर्तविली जात असून तिसर्‍या लाटेचा धोका निर्माण झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com