बर्याच दिवसांपासून लढा सुरू होता. मागील वर्षी अतिवृष्टी अवकाळी पाऊसाने जोरदार थैमान घातले होते शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला होता. कापूस रोगग्रस्त झाला होता व ज्वारी मका पिकावर हिरवे कोंब दिसू लागले होते अशा वेळोवेळी रस्त्यावर उतरून कृषी मंत्री, मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन पिक विमा बाबत न्यायाची भूमिका घेऊन मागणी करत होते. तालुक्यातील शेतकर्यांच्या लढ्यास अखेर यश आले आहे. : किशोर पाटील, तालुका अध्यक्ष, शेतकरी संघटना, पारोळा
एरंडोल / पारोळा । प्रतिनिधी - Erandol -Parola
एरंडोल तालुक्यातील चार व पारोळा तालुक्यातील पाच महसूल मंडळातील शेतकर्यांना आ.चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नाने पीक विमा मंजुर झाला आहे.
एरंडोल तालुक्यात चार महसूल मंडळ
एरंडोल - तालुक्यात एकूण चार महसूल मंडळ असून एरंडोल, रिंगणगाव, कासोदा, उत्राण महसूल मंडळातील शेतकर्यांनी कापूस पिकासाठी एकूण शेतकरी संख्या 3397 एकूण क्षेत्र हेक्टर रक्कम रु. 6 कोटी 98 लाख 64 हजार 35 रुपये व ज्वारी, मका, बाजरी, उडीद पिकासाठी एकूण शेतकरी संख्या 299 एकूण क्षेत्र 396 हेक्टर रक्कम रु.64 लाख रुपये मंजुर झाले असून विमा कंपनीकडे तालुक्यातील शेतकर्यांनी भरणा केला होता. पीक विमा मंजुरीसाठी सतत पाठपुरावा करून आ.चिमणराव पाटील यांनी शेतकर्यांना लाभ मिळवून दिल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले. आ. पाटील, तहसीलदार श्रीमती खेतमाळीस, ता.कृ.अधिकारी श्री बोरसे, गटविकास अधिकारी श्री अकलाडे व सर्व सहकारी यांचे आभार मानून प्रसिद्धीस शिवसेना तालुका प्रमुख वासुदेव पाटील यांनी कळविले आहे.
पारोळा तालुक्यात पाच महसूल मंडळ
पारोळा तालुक्यात एकूण पाच महसूल मंडळ असून पारोळा, बहादरपूर, शेळवे, चोरवड, तामसवाडी मंडळातील शेतकर्यांनी कापूस पिकासाठी एकूण शेतकरी संख्या 12290 एकूण क्षेत्र 13789 हेक्टर रक्कम रु.25 कोटी 11लाख व ज्वारी, मका, बाजरी, उडीद पिकासाठी एकूण संख्या 619 एकूण क्षेत्र 518.33 हेक्टर रक्कम रु.61 लाख साठी विमा कंपनीकडे तालुक्यातील शेतकर्यांनी भरणा केला होता.पीक विमा मंजुरीसाठी सतत पाठपुरावा करून आ.चिमणराव पाटील यांनी शेतकर्यांना लाभ मिळवून दिल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले. आ. पाटील, तहसीलदार गवंदे, ता.कृ. अधिकारी वारुळे, गटविकास अधिकारी श्रीमती गायकवाड व सर्व सहकारी यांचे आभार मानून प्रसिद्धीस प्रा.आर.बी.पाटील तालुका प्रमुख यांनी कळविले आहे.