जिल्ह्यात आणखी 24 गुन्हेगार हद्दपारीच्या रडारवर

पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांची माहिती : यापूर्वीच 51 गुन्हेगारांचा हद्दपारीचा दणका
जिल्ह्यात आणखी 24 गुन्हेगार हद्दपारीच्या रडारवर
डॉ. प्रवीण मुंढेDr. Praveen Mundhe

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यातील गुन्हेगारी संपविण्यासाठी तसेच गुन्हेगार नियंत्रणात येवून कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा म्हणून पोलीस अधीक्षकांनी नुकतेच 51 गुन्हेगारांना एक ते दोन वर्षापासाठी जिल्ह्यातून हद्दपार करुन गुन्हेगारांना दणका दिला आहे.

वारंवार घरफोडी तसेच शरीराविरुध्दचे गंभीर गुन्हे करणारे सराईत गुन्हेगारांच्या याद्या करणाच्या सुचना पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत. यात अ‍ॅक्टीव्ह गुन्हेगारांना हद्दपार करण्याची कार्यवाही सुरु आहे. कायद्यानुसार मिळालेल्या अधिकारांचा प्रभावी पध्दतीने वापर करण्यात येत आहे. गुन्हेगारांच्या हद्दपारीमुळे काही प्रमाणात गुन्ह्यांना आळा बसून गुन्हेगारी कमी होण्यास मदत होणार आहे.

डॉ. प्रविण मुंढे, जिल्हा पोलीस अधीक्षक

आजपर्यंत एकाचवेळी एवढे गुन्हेगार हद्दपार होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अजूनही 24 गुन्हेगार हद्दपारीच्या रडारवर असून त्यापैकी 9 जणांवर कारवाई अंतिम टप्प्यात तर 15 जणांवर कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दै. देशदूतशी बोलतांना दिली आहे.

आठ महिन्याच्या कार्यशाळात 51 गुन्हेगार हद्दपार

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी 22 सप्टेेंबर 2020 रोजी जळगाव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी आपला पदभार सांभाळला. पदभार सांभाळल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी तसेच प्रलंबित गुन्हे यासह विविध बाबींचा आढावा घेतला.

पोलीस अधीक्षक असले तरी मुळातच डॉक्टरची पदवी घेतले डॉ. प्रवीण मुंढे यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी हमखास इलाज शोधला. गुन्हेगारी टोळ्यांसह सराईत गुन्हेगारांचे गुन्हेगारी रेकॉर्डसह तपासून त्यांचे हद्दपारीचे प्रस्ताव पाठविण्याच्या सुचना प्रभारी अधिकार्‍यांना दिल्या.

या प्रस्तावानुसार पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी त्यांच्या आठ महिन्यांच्या काळात जिल्ह्यातील विविध सर्व पोलीस स्टेशनअंतर्गत सराईत गुन्हेगार तसेच गुन्हेगारांच्या टोळ्या हद्दपार केल्या आहेत.

आणखी 24 गुन्हेगार रडारवर

51 गुन्हेगारांच्या हद्दपारीनंतर आणखी 24 गुन्हेगार हद्दपारीच्या रडारवर आहेत. 24 पैकी 9 संशयितांचे प्रस्ताव पाठविण्यात आले असून ते आदेशावर अंतिम टप्प्यात आहे. तर 15 प्रस्ताव कार्यवाहीसाठी उपविभागीय अधिकार्‍यांकडे पाठविण्यात आले असून ते चौकशीवर प्रलंबित आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com