नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

पतीच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरी करु व त्या जागी दीराला नोकरी लावण्यासाठी त्रास दिल्याने कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याची घटना मोगराणी ता.नवापूर येथे घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोगराणी ता.नवापूर येथील यशोदा दीपक कोकणी (३१) हिचे पती मयत झाल्याने त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर तिला नोकरी लागणार होती. परंतू या जागेवर मणिलाल लक्ष्मण गायकवाड यास नोकरीला लावायचे होते.

यासाठी लक्ष्मण बुधा गायकवाड, लिलाबाई लक्ष्मण गायकवाड, मणिलाल लक्ष्मण गायकवाड यांनी अनुकंपाच्या जागी हे यशोदाला नेहमी टोचून बोलून त्रास देत होते. या छळाला कंटाळून यशोदा हिने घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

या महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रविंद्र बाबुलाल कोकणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तिघांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे करीत आहेत.