कोरोना संसर्गाबाबत गैरसमज पसरविणार्‍या सहा जणांविरुद्ध गुन्हा

यावल तालुक्यातील साकळी येथील घटना
कोरोना संसर्गाबाबत गैरसमज पसरविणार्‍या सहा जणांविरुद्ध गुन्हा

यावल | प्रतिनिधी -

तालुक्यातील साकळी येथे तुमच्या समाजामुळे गावात कोरोना विषाणुचा संसर्ग वाढत असल्याचे सांगुन समाज मनात गैरसमज पसरविणार्‍या सहा जणांविरूद्ध यावल पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

साकळी येथे दि.१३ जुलै रोजी ७.३० वाजेच्या सुमारास गावातील अक्सानगर परिसरात राहणारे नुर मोहम्मद शेख कमालउद्दीन (वय २१, धंदा-मिस्तरी) यास उद्देशुन भुषण मधुकर कोळी (वय २०), सागर अशोक पाटील (वय २०), वर्ष विशाल बोरसे (वय २२), गोल्या भोई (वय २२), अक्षय शिरसाळे आणि मनोहर उर्फ भैय्या परदेशी (लोधी) सर्व राहणार साकळी यांनी तुमच्या समाजामुळे गावात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, असे बोलुन आरोप लावल्याने यावल पोलीस स्टेशनला वरील सहा जणांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोनि अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि सुनिता कोळपकर व पोलीस कर्मचारी उल्हास नथ्थु राणे करीत आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com