चाळीसगाव : नागरीकांच्या सतर्कतेने गायी चोर अटकेत

दोन गायीची सुटका, मेहुणबारे पोलीसात गुन्हा दाखल
 चाळीसगाव : नागरीकांच्या सतर्कतेने गायी चोर अटकेत

चाळीसगाव - Chalisgaon

तालुक्यातील पिलखोड येथे गायी व बैले चोरणार्‍या मालेगाव आणि धुळे येथील सहा जणांची टोळी पिलखोड येथील नागरीकांच्या सतर्कमुळे मेहूणबारे पोलीसांच्या हाती लागली आहे. पोलीसांनी या सहाही जणांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून गायी वाहुन नेणारी इंडिगो व दोन गायी ताब्यात घेतल्या आहेत. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

पिलखोड येथील दुध व्यावसायीक भैय्या पांडुरंग पाटील हे आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास आपल्या शेतात दुध घेण्यासाठी मारूती व्हॅनने जात असतांना मालेगाव रस्त्यावर पिलखोड जवळ पुष्पराज हॉटेलच्या पुढे एका शेतात (एमएच.20 आरसी.7753) इंडीगो कारचा पंक्चर काढतांना चार जण मिळून आले. पाटील यांनी त्यांनी चौकशी केली असता हमारे दो आदमी आ रहे असे त्यांनी सांगितले. भैय्या पाटील यांना शंका आल्याने गाडीत पहिले असता दोन गायी कोंबलेल्या दिसून आल्या. पाटील यांनी आपले मित्र तसेच पोलीस पाटलांना आणि मेहूणबारे पोलीसांना माहिती दिली.

पोलीस पाटील यांना फोन करून घटनास्थळी बोलावले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी तात्काळ हवालदार रमेश पाटील, कमलेश राजपूत, अन्वर तडवी यांना घटनास्थळी पाठवले. पिलखोड ग्रामस्थांच्या मदतीने पोलीसांनी आतिक उर्फ रहेमान महंमद सलीम, महंमद शहा हरूण शहा व मैफुजर रहेमान महंमद हरूण तिघे धुळे, रहेमान शहा हारूण शहा रा. मालेगाव यांना पकडले. त्यापैकी दोघे जण उसाच्या शेतातून पळून जात असतांना ग्रमस्थांनी त्यांना पकडले व त्यांना चांगलाच चोप दिला. तर त्यांचे दोन साथीदार शेख जलील शेख खलील व शेख सुलतान शेख अब्दुल रज्जाक दोन्ही रा. मालेगाव हे एमएच.41 झेड.9845 या पल्सर मोटारसायकलने मालेगावकडे पळून गेले.

त्यांना साकुर फाटा चेक पोस्टवर ड्युटी वर असलेले पोलिसांना दूरध्वनीवरून कळवले असता या दोघाना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सहाही संशयितांना मेहूणबारे पोलीसांनी इंडिगो गाडीसह त्या गायी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली असता या टोळीने जामदा शिवारातील नारायण पाचपुते यांच्या गोठ्यातील एक तर त्यांच्याच शेजारी असलेल्या ओंकार पाचपुते यांची एक अशा दोन गायी चोरून नेल्याची कबुली पोलीसांना दिली. याप्रकरणी शेतकरी नाना पाचपुते रा. जामदा यांच्या फिर्यादीवरून सहाही जणांच्या विरोधात मेहूणबारे पोलीस ठाण्यात भादंवि कलम 379,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com