covid-19 शोधमोहीमेला प्रतिसाद
जळगाव

covid-19 शोधमोहीमेला प्रतिसाद

१०७ जणांची तपासणी, नशिराबाद ग्रामपंचायत-प्राथमिक आरोग्य केंद्राने राबविली मोहीम

Rajendra Patil

नशिराबाद - Nashirabar

येथे अनेक दिवसांपासून करोना बाधित रूग्ण आढळून येत आहेत. खबरदारी म्हणून ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून संसर्ग टाळण्यासाठी व प्रतिबंध घालण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचेच फलीत याठिकाणचे बरे झालेले रूग्णांची संख्या चांगली दिसून येत आहे.

दि.५ ऑग्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत नशिराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने covid-19 शोधमोहीम शिबीर घेण्यात आले. यात १०७ जणांची तपासणी करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, सरपंच विकास पाटील उपसरपंच किर्तीकांत चौबे, माजी सरपंच पंकज महाजन, सपोनी प्रविण साळुंखे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप पाटोळे, प्रांताधिकारी सौ.दीपमाला चौरे, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ.पराग पवार, डॉ.चेतन अग्निहोत्री, डॉ.निलेश पाटील, डॉ.राकेश महाजन, गिरीश रोटे, योगेश गावडे, संतोष रगडे, पराग रोटे, ग्रामपंचायत कर्मचारी, अशोक पाचपांडे, औषध निर्माण अधिकारी पी.डी.कोडी, आरोग्य सहाय्यक आबा पाटील, आरोग्य सेवक पंकज तायडे, आरोग्य सेवक दीपक तायडे, आरोग्य सेवक आर.आर. पाटील, वसीम शेख, सौ.मेघा चौधरी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ गणेश राजपूत, शिपाई राजाराम पाचपांडे, वाहन चालक यांचेसह गावातील सुमारे २५ आशा वर्कर यांनी काम पाहिले. शिबीरात दोन प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या, यामध्ये RT PCR 50 Covid antigen 57 एकूण 107 व्यक्तींची तपासणी करण्यात आली

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com