अमळनेर प्रतिनिधी Amalner

पाणी फौंडेशनच्या स्पर्धेत तालुक्यात, जिल्ह्यात, आणि राज्य बरोबरच आता देश पातळीवर तालूक्यातील आनोरे गावाला राष्ट्रीय जल पुरस्कार २०१९ चे देशात दुसरे बक्षीस मिळाले.

आनोरे गावाला सतत १२ महिने पाणी टंचाई असल्याने टँकर लागत होते गावाने पाणी फाऊंडेशन च्या स्पर्धेत भाग घेतला आणि एकजुटीने संपूर्ण गाव कामाला लागले होते. गावाने प्रत्येक घराला सारखा रंग देऊन त्यावर पाणी बचाव ,सामाजिक राष्ट्रीय संदेश रेखाटले होते, प्रत्येक घरातील व्यक्तीने एकाच दिवशी शोष खड्डा खोदून एकाच दिवसात काम पूर्ण केले होते प्रत्येक घराच्या धाब्यावरील पाणी जमिनीत जिरवण्यात आले होते रेन वॉटर हार्वेस्टिंग केले गावाची एकजूट एव्हढी होती की शेताची बांध बंदिस्ती व शेततळी सामूहिक रित्या तर खोदले त्यातून मोठ्या प्रमाणात मृदा व जल संधारण तर झाले एक घर एक झाड हा उपक्रम राबवून गावाच्या प्रमाणात मृदा व जल संधारण तर झाले एक घर एक झाड हा उपक्रम राबवून गावाच्या प्रवेश वाटेवर देखील झाडे लावण्यात आली होती.

दोन वर्षात गाव एव्हडे समृद्ध झाले की एकेकाळी 12 महिने टँकर लागणारे गाव लॉक डाऊन काळात अमळनेर तालुक्याला भाजीपाला पुरवत होते एव्हडे पाणी साचून बागायती व जीपाला उत्पन्न घेतले जात आहे विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. जलमंत्रालयातर्फे देण्यात येणारा राष्ट्रीय जल पुरस्कार आनोरे गावाचा देशात दुसरा क्रमांक आला आहे ११ नोव्हेंबर रोजी पुरस्कार वितरित होणार आहे.