<p><strong>जळगाव - Jalgaon</strong></p><p>जिल्ह्यातील 687 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला तालुक्याच्या ठिकाणी प्रारंभ झाला असून पुढील काही वेळात निकाल यायला सुरवात होईल.</p>.<p>निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली असून निकालाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मतमोजणी सुरू झाली असून सर्व मतमोजणी केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच मतमोजणी नंतर संवेदनशील गावांमध्ये पोलीसांचे लक्ष राहणार असल्याचे पोलीस अधिक्षकांनी यापुर्वीच सूचना केल्या आहेत.</p>