बनावट देशी दारुचा 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

बनावट देशी दारुचा 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन विभाग पुणे यांची कारवाई : स्थानिक अनभिज्ञ

भुसावळ - Bhusawal - प्रतिनिधी :

येथील वांजोळा रोडवरील एका गोडाऊनमधून तब्बल 11 लाख रुपये किमतीची बनावट टँगो पंच कंपनीची देशी दारु जप्त करण्याची कारवाई 17 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पुणे विभागातील श्रीरामपुर जि. अहमदनगरच्या भरारी पथकाने केली. या कारवाईमुळे अवैध दारु विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मागील काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. त्या संदर्भात काहीपथके तपासासाठी जिल्ह्याबाहेर रवाना झाले आहे. पथकाने भुसावळात कारवाई केली किंवा नाही याबाबत आपल्याकडे अधिकृत माहिती अद्याप नाही.

गणेश पाटील अधिक्षक, राज्य उत्पादन विभाग अहमदनगर.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील कन्हाळा रोडवरील गणेश कोटींग अँड फर्निचर या फर्मच्या गोडावून मधून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने टँगो पंच कंपनीच्या बनावट 350 बॉक्स व 200 लिटरच्या तीन टाक्या असा एकुण 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तत्पूर्वी या बनावट देशी दारुचे नमुने पथकाने घेतले आहे. हे गोडाऊन गणेश कोटींग अँड फर्निचरचे रवी ढगे यांचे असल्याचे समजते. दरम्यान, सदरचा गट नंबंरचा उतारा मिळवून मालकाचे नाव स्पष्ट केले जाणार असल्याचे पथकाकडून सांगण्यात आले.

याबाबत रवी ढगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

दरम्यान, या कारवाईबाबत स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मात्र अनभिज्ञ असल्याचे आढळून आले. पथकाने सदरचा मुद्देमाल सोबत आणलेल्या ट्रकमध्ये भरुन जप्त केला आहे.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात मागील काही महिन्यांंपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अनधिकृत गोडाऊनवर छापा मारुन कारवाई केली होती.

यातील अटकेतील आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर पथकाने भुसावळ येथील या गोडाऊनवर कारवाई केली. पुढील तपासाच्या दृष्टीकोनातून अधिक माहित देण्यास संबंधित पथकाने नकार दिला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक सदरच्या गोडावूनवर दाखल झाले असता गोडावूनचे मुख्य गेट बंद असल्यामुळे पथकाने गेटवरील कुलुप तोडून गोडावूनमध्ये प्रवेश केला. त्या ठिकाणी संशयित आरोपी कोणी आढळून आला नाहे.

मात्र गोडावूनमध्ये 200 लिटरच्या दहा टाक्यांपैकी तीन टाक्यांमध्ये सदरचे बनवट रसायण व 350 तयार खोके गोडावूनमध्ये आढळून आले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक पुणेचे आयुक्त कांतीलाल ईमामा, उपायुक्त प्रसाद सुर्वे, निरीक्षक दिनगंबर शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी निरीक्षक एस.आर. गायकवाड, फिर्यादी एस. एस. पोंघे, निरीक्षक एस.के. कोल्हे, दुय्यम निरीक्षक प्रकाश अहिरराव, कैैलास यत्रे, एएसआय संजय रानमावकर, विकास कंठाके, अमर कांबळे एस.एम शेख, प्रविण सावळे यांनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com