Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporation
जळगाव

जळगाव : सफाईच्या ठेक्यात सव्वाकोटींचा भ्रष्टाचार

सुनील महाजन यांची चौकशीची मागणी; पोलिसात तक्रार दाखल करणार

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon

शहरातील एस. के. काँन्टॅॅ्रक्टरला दिलेल्या साफसफाईच्या ठेक्यात 1 कोटी 20 लाखाचा भ्रष्टाचार झाला असून विना टेंडर दिलेला हा मक्ता आहे, यात हजेरी बुकही बोगस असून यात भाजपा नगरसेवकांचे नातेवाईकांचेही नावे आहेत. या मक्तातून शासनाची आर्थिक पिळवणूक होत असून यात सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांचाही सहभाग आहे, विना टेंडर, विना अटी शर्तीने दिलेला हा ठेका असून यातील भ्रष्टाचाराबाबत पोलिसात नगरविकास मंत्र्यांमार्फत वरिष्ठ पातळीवर तर पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती पत्रकर परिषदेत विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी दिली. यावेळी माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी नगरसेवक व शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, नगरसेवक नितीन बरडे आदी उपस्थित होते.

6 मार्चला वॉटरग्रेसचे काम मनपाने थांबवले होते व एस. के. कॉन्ट्रॅक्टरला मक्ता दिला गेला. चार महिन्यात आतापयर्र्त 2 कोटी 40 लाखाची अदायगी मनपाकडून मक्तेदाराला करण्यात आली आहे. या एस. के. कॉन्ट्रॅक्टरचे 70 जण पार्टनर आहेत. या ठेक्यातील कागदपत्रांची शहनिशा केली असता यात अनियमितता, भ्रष्टाचार असल्याचे दिसून येत आहे. एस. के. कॉन्ट्रॅक्टरला बांधकाम विभागात फक्त 9 मजूर पुरवण्याचा ठेका प्रारंभी मंजू झाला होता. आता मात्र 400 कामगार गटरव रस्ते सफाईसाठी तर 250 कामगार वाहनचालक म्हणून असे 650 कामगार पुरवण्याचा ठेका देण्यात आला. शासन निर्णयानुसार 3 लाखाच्या वर असलेल्या कामासाठी निविदा काढण्यात येते.

मात्र कुठलीही निविदा न काढता हा मक्ता एस के. कॉन्ट्रॅक्टरला मुद्दामच देण्यात आला आहे. वॉटरग्रेसला ठेका दिला तेव्हा कचरा न उचलणे 500 रुपये दंड, कामगार कामावर न आल्यास 500 रुपये प्रमाणे दंड आकारण्यात येत असे, आता मात्र एस. के. कॉन्ट्रॅक्टरला ठेका दिल्यानतर 4 महिन्यात असा कुठलाही दंड आकारला जात नाही, टेंडरे न काढताच हा मक्ता दिलेला आहे. वॉटरग्रेसला दिलेला मक्ताचे वेळी वाहन डिझेल, मेंटेनन्स हा खर्च मक्तेदाराकडे होता तर आताच्या मक्त्यात हाच खर्च मनपाकडे आहे एस.के. कॅन्ट्रॅक्टरकडे नाही, पहिला मक्ता हा 75 कोटी पयर्र्त 5 वर्षासाठी होता, आताचा ठेका हा 85 कोटी पयर्ंत जाणार असून तब्बल 10 कोटी रुपये जास्त खर्च होणार आहे.

हा ठेका सतत सुरू ठेवण्यासाठी एका मनपा लेव्हलच्या बड्याचा सहभागासह काही सत्ताधारी नगरसेवक, प्रशासनीक अधिकार्‍यांचाही खटाटोप सुरू आहे. एकीकडे विनाअट टेंडर न काढता हा मक्त ा दिलेला आहे तर दुसरीकडे कोरोनाच्या औषध खरेदीसाठी 1 कोटीच निधीतून अद्याप टेंडर काढले जात नाही त्यात नगरसेवक ढवळाढवळ करतात. वॉटरग्रेसकडून कामगाराच्या खात्यात पी.एफ, पगार जमा होत असत. आता मात्र पैसे कामगारांना न मिळता डायरेक्ट ठेकेदाराच्या बँक खात्यात जातो. वॉटरग्रेसला कामगारांना किमान वेत न देणे, कामगारांचे पी.एफचे पैसे दिले जात नाही, मक्तेदाराच्या बँक खाात्यात सरळ पैसे जमा आहे.

मनपाकडून सफाई कामगार व वाहन धारकांना प्रत्येकी 520 रुपये प्रमाणे एक दिवसाचा पगार दिला जातो मात्र मक्तेदाराकडून महिलेला 200 व पुरुषास 250 रुपये प्रमाणेच पगार दिला जातो, म्हणजे या मक्तेदाराकडूनही कामगारांना किमान वेतननुसार वेतनही दिले जात नाही, रोजगारही दिला जात नाही, कामगारांची पिळवणूक केली जात आहे, तसेच आरोग्य निरीक्षकांकडून बोगस हजेरी भरवली जात आहे, कामगारांचे हजेरीचे प्रमाण 96.2 टक्के आहेत म्हणजे कामगारांची जास्तीत जास्त हजेरी हे पैसे लाटण्यासाठी लावली जात आहे, प्रत्यक्षात एवढे कामगार कामावर हजर नसतातच असे आमच्या पाहणीतून आढळून आले आहे.

हे टेंडर चालूच रहावे यासाठी सत्ताधारी नगरसेवकांचाच दबाव आयुक्तांवर व मनपावर आहे, वॉटरग्रेसला 2 कोटीची सॉल्व्हन्सी होती, या एस.के. मक्तेदाराला सॉल्व्हन्सीही नाही, बँक गॅरंटीही घेतली नाही, एवढी मेहरबानी या मक्तेदारावर का? असाही प्रश्न श्री. महाजन यांनी केला आहे. हा ठेका कोणत्या नियमानुसार, कोणत्या कायद्यानुसार देण्यात आला, यामागील तो बडा मनपा लेव्हलचा सहभागी कोण?, या मक्तेदाराकडे मोठ्या प्रमाणावर मजूर पुरवण्याचा परवाना आहे का ?

तसेच वॉटरग्रेस ठेका देतेवेळी प्रथम भाजपा नगरसेवकांना प्रत्येकी 10 हजार प्रमाणे देण्याचे ठरले होते मात्र त्यांना वॉटरग्रेसकडून ते मिळाले नाहीत तसेच आताच्या मक्तेदाराकडूनही हे 10 हजार प्रत्येकी देण्याचे ठरले मात्र यात वाढ करुन हा आकडा प्रत्येकी 15 हजाराचा करुन घेण्यात आला मात्र याही मक्तेदाराकडून भाजप नगरसेवकांना पैसे मिळाले नाहीत यामुळे या नगरसेवकांत असंतोष आहे. तरी या संपूर्ण मक्त्याची चौकशी व्हावी यासाठी आपण पालकमंत्र्यांमार्फत नगरविकास मंत्रालयाकडे तसेच आपण स्थानिक पातळीवर पोलिसांकडे लवकरच तक्रार दाखल करणार असल्याची माहितीही श्री. महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com