‘कोरोना’ थांबेल, आत्मविश्वास वाढवा
जळगाव

‘कोरोना’ थांबेल, आत्मविश्वास वाढवा

‘कोरोना’ संसर्ग वाढीमुळे जनता भयभीत

Rajendra Patil

बाळासाहेब पाटील

पारोळा ।

पारोळा तालुक्यातील ‘कोरोना’ संसर्ग वाढीमुळे जनता भयभीत झाली असली तरी हे ‘कोरोना’चे भूत वाढविण्याच्या प्रकारात अफवांना जास्तच उत आला असून हे अभूतपूर्व भूत ग्रामीण भागातील कांही चंगळवादी खतपाणी घालून शासन प्रशासनाला वेठीस धरू पाहत आहेत.

जगभरापेक्षा देश व राज्यात ‘कोरोना’ची संख्या वाढीस आपणच जबाबदार असल्यामुळे तालुक्यातूनही हाच प्रकार आपल्याला काही होणार नाही; अन दुसरीकडे झाल्यास त्याच तोंडसुख घेण्यात मागे नाहीत. अशाच या प्रकारामुळे दोन महिन्यापूर्वी श्री बालाजी महाराज कृपाशीर्वादानं इकडे फिरकला सुध्दा नसलेला ‘कोरोना’ आता तुम्ही-आम्ही गर्व अन् गुर्मीचे बळी ठरत आहोत. अफवा पसरविणार्‍या गावगुंडाचा पर्दाफाश केला जावा, अशी मागणी आता वाढू लागली आहे.

शासन-प्रशासन कसोशीने प्रयत्न करून आपला तालुका ‘कोरोना’मुक्त करण्याच्या यशस्वीने युध्द पातळीवर लढा देत आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अनिल गवांदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रांजली पाटील, डॉ.योगेश साळुंखे, डॉ.चेतन बडगुजर, डॉ.शीतल मिसर, सपोनि रवींद्र बागुल यांचेसह डॉक्टर पोलीस टीम, न.पा.मुख्याधिकारी विजयकुमार मुंढेची टीप यांच्या अथक परिश्रमाने तालुका ‘कोरोना’ मुक्तीकडे वाटचाल करीत आहे.

शहरात जनतेची आरोग्य तपासणी दोन दिवस घेवून जनता ‘कोरोना’ भय मुक्त होणारच असा दावा तहसीलदार अनिल गवांदे यांनी तालुक्यातील सक्षम व कर्तव्यदक्ष अधिकारी-कर्मचारी वर्गाच्या हिंमतीवर केला असून पॉझिटिव्ह आलेला रूग्ण पुन्हा दोन दिवस औषधोपचाराने निगेटिव्ह येतच आहेत तर काही पहिल्या तपासणीतच निगेटीव्ह येत आहेत.

‘कोरोना’ हरविण्यासाठी रूग्णांना बळ देण्याऐवजी त्याला अस्पृश्य समजणे, वाळीत टाकणे, घृणा निर्माण करून त्याच्या व त्याच्या कुटुंबियांबाबत अप्रचार करून अफवा पसरविणे अशा विघ्नसंतोषींवर तातडीने गुन्हे दाखल झाल्यास ‘कोरोना’मुक्त तालुका लवकरच पाहायला मिळेल, अशी शाश्वती डॉ.प्रांजली पाटील यांनी दिली आहे. अन्य जनांच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन ही डॉ.पाटील यांनी केले आहे.

पारोळा तालुक्यात आजतागायत श्री बालाजींच्या कृपेने अघटीत असे काही घडलेच नाही, या तालुक्यात काही माणसं जनहितासाठी अहोरात्र झटत असतात, ती ओठावरची तहान, पोटातली भूक अन् डोळ्यातील दु:खाश्रु जाणणारी संत-महंत माणसात त्यांची गणना केली जाते. अशा माणसांमुळे तालुका आजही सुखी अन् समृध्दीकडे वाटचाल करीत आहे, पण काही दळभद्री अन् दुसर्‍याच्या दु:खात आनंदी असणारी माणसंच तालुक्याला अवहेलनाच्या खाईत टाकू पाहत आहे. त्यांचा बंदोबस्त पोलीस प्रशासनाने करावा, अन्यथा श्री बालाजी महाराज त्यांना अद्दल घडविल्या शिवाय राहणार नाही.

तालुका ‘कोरोना’ मुक्त होण्यासाठी आपला आत्मविश्वास वाढवा. शासन प्रशासनास सहकार्य करा, अफवांवर विश्वास ठेवू नका यामुळेच नक्की ‘कोरोना’ थांबेल अशी इच्छा अन् अपेक्षा करूया.
Deshdoot
www.deshdoot.com