<p><strong>जळगाव - Jalgaon</strong></p><p>येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचे पहिले लाभार्थी ठरले अधिष्ठाता डॉ.रामानंद, त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जमादार यांना लस देण्यात आली.</p>.<p>यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार यांचेसह आरोग्य यंत्रणेचे डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.</p>