जळगाव : जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांची करोना टेस्ट

महापौरांनी दिले आयुक्तांना पत्र
जळगाव : जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांची करोना टेस्ट

जळगाव - Jalgaon

शहरात करोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढता असला तरी नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहे. एखादा संसर्गबाधित व्यक्ती बाहेर फिरत असेल तर त्यामुळे अनेक लोक बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील सर्व विक्रेत्यांची अँटीजन चाचणी करावी आणि ज्यांची चाचणी कोरोना निगेटिव्ह येईल त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे. तपासणीकामी अतिरिक्त अँटीजन टेस्ट किट मागवाव्या अशी मागणी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव महापालिकेकडून सर्वोतोपरी उपाययोजना करण्यात येत आहे. नागरिकांना वारंवार आवाहन केल्यानंतर देखील लोक विनाकारण घराबाहेर पडत आहे. शहरात आज अनेक नागरिक कोरोना बाधित असण्याची शक्यता असून लॉकडाऊन उघडल्यानंतर बरेच विक्रेते, व्यावसायिक, दुकानदार बाहेर पडले आहे. बाधित लोकांमुळे कोरोनाचा फैलाव अधिक होण्याची शक्यता आहे.

विक्रेत्यांची करावी कोरोना चाचणी

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणखी कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे. शहरातील भाजीपाला, फळ, दूध, चिकन- मटन, सलून व्यावसायिक, मेडिकल चालक आणि किराणा दुकानदारांची कोविड-१९ टेस्ट करण्यात यावी. मनपा प्रशासनाकडून त्यासाठी नियोजन करून अतिरिक्त अँटीजन टेस्ट किट मागवाव्या अशी मागणी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com